नवी मुंबई:-खारघर सायबर सिटी मध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून संविधान दिन साजरा.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
खारघर सायबर सिटी मध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून संविधान दिन साजरा.
खारघर नवी मुंबई प्रतिनिधी; शिव-आधार सामाजिक सेवा संस्था सेक्टर ,खारघर संविधान दिनाचे औचित्य साधून दि 27 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्रीय विहार कम्युनिटी हॉल ,से 11, येथे व्याख्यान आयोजित केले होते.व्याख्यानाचा विषय संविधान आजचे वास्तव आणि आपण हा होता.व्याख्याते संविधानाचे प्रसिद्ध अभ्यासक आणि विश्लेषक श्री सुरेश सावंत सर होते यावेळी त्यांनी संविधान विषयक मोलाची माहिती दिली.यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी उद्देशिका पठन केले .साविधाना विषयी लोकांना माहिती देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठीअसेच कार्यक्रम भविष्यात मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकारी यांनी केला.
आपल्या व्याख्यानात सावंत सर म्हणाले भारतीय उपखंडात लोकशाहीची प्रक्रिया बौद्धांच्या काळा अगोदरपासूनच अस्तित्वात होती आपल्या संविधानातील मूल्य ही परंपरागत आलेली आहे बाबासाहेब आंबेडकर जरी घटनेचे शिल्पकार असले तरी घटनेचा मसुदा व घटनेतील मूल्यांबाबतचा विचार हा अगोदर पासूनच चर्चेत होता घटना समितीमध्ये त्यावर चर्चा विचार विनिमय बदल सूचना या सगळ्या प्रक्रियेनंतर बनलेली घटना आहे घटनेचा पूर्ण सार हा आपल्या घटनेच्या उद्देशिकेत एका वाक्यातील वेगवेगळ्या शब्दात सामावलेला आहे लोकशाहीचे वैशिष्ट्य हे की सत्ता कोणाच्याही हातात असली तरी देशाचे मालक हे नागरिकच राहतील म्हणूनच उद्देशिकेत प्रथम वाक्यात म्हटले आहे आम्ही भारताचे लोक किंवा नागरिक आणि शेवटी म्हटले आहे की स्वतः प्रत अर्पण करत आहोत.