कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथे विजेचा लपंडाव ; नागरिक हैराण.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

मायणी येथे विजेचा लपंडाव ; नागरिक हैराण.

 

मायणी :प्रतिनिधी तानाजी चव्हाण

मायणी व मायणी परिसरामध्ये गेली दोन ते महिन्यापासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचा लपंडाव सुरू असून दिवसातून अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो.त्यामुळे शेतकरी,छोटे -मोठे व्यावसायिक, व्यापारी,उद्योगधंदे यांचे अतोनात नुकसान होत आहे.त्याबाबत मायणी ग्रामस्थ व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोग यांचे वतीने मायणी परिसर अभियंता मा.श्री.विशाल नाटकर साहेब यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

चौकट : – वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतोच या संदर्भात वीज महामंडळाने योग्य ती अमंलबजावणी केली नाही तर जन आंदोलन उभारण्याचा इशारा राज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाने याबाबत दखल घेतली असून आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . संतोष बजाज साहेब (दिल्ली) यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी याविषयी योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.

चौकट : –

याबाबत अधिक माहिती देताना मायणी अभियंता विशाल नाटकर यांनी सांगीतले की,पूर्वी वीज पुरवठा खंडित होत होता . परंतु सध्या आम्ही वीज पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केले असून अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्यातून विद्युत पुरवठा गेल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असे याबाबत आम्ही आठ ते दहा दिवसात सर्व फांद्या काढण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक विभागासाठी जे कर्मचारी आहेत.त्यांचा फोन नंबर ऑफीसच्या दर्शनी फलकावर लावण्यात येईल.व लाईट बंद झालेस त्याची सुचना मायणीतील व्हॉटसअप ग्रुपवर देण्यात येईल मायणी व मायणी परिसरातील लाईट संदर्भात कोणतीही अडचण असल्यास माझेशी व्यक्तिश : संपर्क साधावा .

मायणी अभियंता विशाल नाटकर फोन नं : 9029168632

यावेळी दिलीप पुस्तके, राजाराम कचरे,डॉ.संतोष डांगे,राजाराम जाधव उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button