साखरवाडी परिसरात विविध दुकानात चायनीज मांजाच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम.
प्रतिनिधी:- समीरखान पठाण फलटण :-9766685375

साखरवाडी परिसरात विविध दुकानात चायनिज मांजाच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीसांची शोध मोहिम
फलटण ग्रामीण / समीर पठाण
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पोलिस निरिक्षक मा.धन्यकुमार गोडसे यांचे वतीने हद्दीतील सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की .येणा – या श्रावण महिन्यातील नागपंचमी सना निमित्त पंतंग ऊडविण्यासाठी अवैध चायनिज मांजाची चोरुन विक्री केली जाते तसेच जवळ बाळगणे त्याचा वापर करणे अशा प्रकारच्या कृत्या मुळे चायनिज | प्लॅस्टीक , नॉयलॉन सिन्थेटीक पासून बनविलेल्या मांज्या मुळे जिवीत हाणी होऊ शकते तसेच | नुकसान होवू शकते व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणुन सारवाडी पोलीस दुरक्षेत्राच्या महिला अधिकारी स्वाती धोंगडे , पो.हवा . हांगे ब.नं. ९९ ६ . पो . हवा बड़े ब.नं.९ १ पो.कॉ. गायकवाड ब.नं. २५३० असे एक पथक नेमूण साखरवाडी बाजारपेठ येथील क्र . १ ) श्रीयश जनरल स्टोअर्स येथील गणेश रजनिकांत जाधव रा . साखरवाडी २ ) मधुकर विठ्ठल ठोंबरे किराणा स्टोअर्स ३ ) अलंकार वस्तू भांडार ४ ) महेश सुरेश पवार साई व्हरायटी साखरवाडी ५ ) सादिक इसामाईल मणेर ६ ) सिध्दी केक शॉपी साखरवाडी सदरची दुकाने | चेक केली असता त्या ठिकाणी चायनिज मांज्या मिळून आला नाही.तसेच साखरवाडी परिसरातील सर्व दुकानदार व्यावसायीक यांना चायनिज मांजा विक्री न करण्या बाबत | योग्य त्या सुचना देवून मा . उच्च न्यायालयाच्या मांज्या विक्री प्रतिबंधात्मक असलेल्या निर्देशा बाबत माहीती दिली आहे . तसेच सदर चायनिज मांजा दुकानात अगर ईतर ठिकाणी कोणी चोरटी अवैध | विक्री करित असताना मिळून आल्यास त्याचेवर कडक कायदेशीर कारवाई करणेत येईल असे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे वतीने कळविण्यात येत आहे . तसेच कोणी चोरुण मांजा विकत असेल तर खालील नंबर वर संपर्क साधावा माहीती देण्या – याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल म . पोलीस उप निरीक्षक धोंगडे मो.नं. ८ ९ ७५२६८२२० फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ०२१६६२२२५३३ सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक सो , सातारा अप्पर पोलीस अधिक्षक सो , सातारा यांचे सुचने प्रमाणे श्री तानाजी बरडे उप विभागीय पोलीस अधिकारी सो फलटण | भाग फलटण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली साखरवाडी पोलीस | दुरक्षेत्राच्या महिला अधिकारी स्वाती धोंगडे , पो.हवा . हांगे ब.नं. ९९ ६ , पो.हवा . बडे व.नं.९ १ पो.कॉ.गायकवाड ब.नं. २५३० यांनी केलेली आहे.