क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेगाव-(पुणे):-मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरटयाकडुन एकुण तिन मोटारसायकल केल्या जप्त. आंबेगांव पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 आंबेगाव-(पुणे):-मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरटयाकडुन एकुण तिन मोटारसायकल केल्या जप्त. आंबेगांव पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी.

दिनांक २०/०६/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दिमध्ये गुन्हे प्रतिबंधकच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन गाडे, प्रमोद भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं २८४/२०२५ बी.एन.एस. कलम-३०३(२) या गुन्हयातील चोरीस मोटारसायकल ही इसम नामे अजय मर्याप्पा जावीर याने चोरी केली असुन तो सदरची मोटारसायकल सह जांभुळवाडी तलाव जवळ बसलेला आहे. सदरवेळी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार असे प्राप्त बातमीच्या ठिकाणी गेले असता तलावाजवळ मोकळया जागेत एक इसम संशीयतरीत्या मोटारसायकलवर बसलेला दिसला. त्यावेळी त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव १) अजय मर्याप्पा जावीर वय-२९ वर्षे काम बिगारी रा. दुर्गामाता मंदिराचे मागे, हनुमाननगर, शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे असे सांगितले. त्यानंतर सदर इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल ही दिनांक १४/०६/२०२६ रोजी हरिओम हार्डवेअर समोरुन, जांभुळवाडी रोड, शनिनगर चौक येथुन चोरली असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडुन नमुद गुन्हयातील मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याचेकडे अधिक कसुन चौकशी केली असता त्याने भारती विद्यापीठ, पुणे स्टेशन परीसरातुन मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले असुन त्याचे ताब्यातुन एकुण तिन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. संजय दराडे पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.

(श्री.शरद झिने) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button