कराड:-आईच्या नावाने एक झाड; पर्यावरण रक्षणाचा हरित संकल्प नांदगावातून साकार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आईच्या नावाने एक झाड; पर्यावरण रक्षणाचा हरित संकल्प नांदगावातून साकार.

कराड:-जागतिक पर्यावरण दिनी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
“माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः”
ही भूमी माझी माता असून मी तिचा पुत्र आहे. — अथर्ववेद
नांदगाव, ता. कराड : वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि घटते वनक्षेत्र या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदगाव येथे भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडलाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संरक्षणासोबतच मातृभक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
गावातील सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच यांसारख्या देशी व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत त्यांना नियमित पाणी, संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प केला. केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे हेच खरे पर्यावरण रक्षण असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भाजपा सातारा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मा. पंकज पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. एक प्रौढ वृक्ष अनेकांना आवश्यक प्राणवायू पुरविण्यासोबतच वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत करतो, असे त्यांनी नमूद केले.
भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष मा. प्रविण साळुंखे यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमामागील भावनिक भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणे हा आहे. आई जशी आपल्या मुलांचे संगोपन करते, त्याचप्रमाणे पृथ्वीमातेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी “आज एक झाड, उद्या हिरवेगार भविष्य”, “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” आणि “पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा” या घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष मा. प्रविण साळुंखे, भाजपा सातारा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मा. पंकज पाटील, नांदगावचे सरपंच मा. हंबीरराव पाटील, डॉ. सुरेश सुकरे, साळशिरंबेचे माजी उपसरपंच मा. वसंतराव मोहिते, मा. विकास पाटील, मा. विलास चवरे, मा. जयकर पाटील, मा. पै. प्रकाश पाटील, मा. पोपट पाटील, मा. बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌿 विशेष
“झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य ठेव आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला, तर पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक बळकट होईल.”
पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि मातृप्रेम यांचा सुंदर संगम घडवून आणणारा ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम नांदगाव परिसरात हरित भविष्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. 🌳🌍🙏




