भारती विद्यापीठ:-(पुणे)-विधीसंघर्षीत बालकाकडुन गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विधीसंघर्षीत बालकाकडुन गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत.

भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
दिनांक ०५/०६/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षीत बालक अग्नाशस्त्रासह कात्रज हायवेवरील त्रिमुर्ती गार्डनसमोरील झाशीची राणी भुयारी मार्गाजवळ, आंबेगाव बु, पुणे येथे थांबला आहे.
त्याप्रमाणे लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी सदर निकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता विधीसंधर्षीत बालक हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपय किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व १०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसांसहीत दिनांक ०५/०६/२०२६ रोजा २०.२८ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२८/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ नह २५. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, तसेच राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
(मानसिंग पाटील) वरीष्ठ पोलीस निरीक्षक
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर




