ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-मौजे निनाम ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्नी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे यांना निवेदन.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मौजे निनाम ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्नी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे यांना निवेदन.

सातारा:- निनाम येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास योजनेअंतर्गत मौजे निनाम मातंग वस्ती, ता. सातारा येथे “नाले बांधकाम करणे” या कामासाठी रु. *९,९९,९९३* /- एवढ्या रकमेची तांत्रिक मंजुरी प्राप्त झालेली आहे.सदर अनुसूचित जातीतील मातंग वस्तीतील नागरिकांना पावसाळ्यात सांडपाणी तुंबण्याची, डास व साथीच्या रोगांची समस्या दरवर्षी भेडसावते. त्यामुळे सदर काम तातडीने करणे अत्यावश्यक आहे.तरी, लोकहित व वस्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने वरील कामाचा तातडीने कार्यारंभ आदेश/Work Order निर्गमित करून काम सुरू करण्यास तात्काळ मान्यता द्यावी या मागणीचे निवेदन **जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे , मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष गणेश भिसे यांनी दिले* .
*
यावेळी तात्काळ संबंधित अधिकारी यांना बोलावून सदर कामाची वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश देत पावसाळ्यापूर्वी काम करण्याच्या सूचना देत अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनुसूचित जाती जमातीतील लोकवस्तीतील कामाबाबत हलगर्जी खपवून घेणार नाही असा सज्जड दमच दोन्हीही आर्यन लेडीनी दिला.

मागणीच्या अनुषंगाने दिरंगाई झाली तर *रिपाईंच्या वतीने जनआंदोलन* करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र वायदंडे, शहरअध्यक्ष नागेश सातपुते,ऋतुराज चांदणे ,सिद्धार्थ वायदंडे यांच्यासहित लक्ष्मण चव्हाण, अरुण यादव, सौ.हिराबाई चव्हाण, सौ.आशा यादव,बाळकृष्ण वायदंडे, सौ.मंगल वायदंडे, लिलाबाई वायदंडे ,सौ.रंजना वायदंडे,संपत चव्हाण, साहेबराव चव्हाण,प्रवीण चव्हाण यांच्यासहित निनाम ग्रामस्थ उपस्थित होते

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button