श्रीरामपूर:-एसपी सुदर्शन यांच्या शिंगणापुरातील कर्तव्याचे सर्वसामान्यांनाकहून कौतुक …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

एसपी सुदर्शन यांच्या शिंगणापुरातील कर्तव्याचे सर्वसामान्यांनाकहून कौतुक …..

श्रीरामपुर / माळेवाडी ( प्रतिनिधी )
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शनि अमावस्या व शनिजयंतीच्या दिवशी शनिशिंगणापुर येथे स्वतः बंदोवस्तासाठी उभे राहून गर्दी नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली त्यांच्या या कर्तव्यदक्षेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे पदाचा कोणताही अहंकार न बाळगता लाखो भाविकांच्या गर्दीत स्वतः बंदोबस्तात उभे राहून त्यांनी वाहतूक व गर्दीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली इतकेच नव्हे तर मंदिर परिसरात पडलेल्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या प्लास्टिक व पूजा साहित्य स्वतः उचलून स्वच्छतेचा संदेश दिल्याने त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे
शनि जयंती आणि शनि अमावस्या हा दुर्मिळ योग एकत्र आल्याने शनिशिंगणापूर येथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनाथ करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी स्वतः मंदिर परिसरात जवळपास सहा तास तळ ठोकत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी असूनही त्यांनी कोणताही बडेजाव न दाखवता मंदिर परिसरात पडलेला कचरा स्वतः उचलला तेलाच्या रिकाम्या बाटल्या ‘ प्लास्टिक आणि पुजेचे साहित्य गोळा करून त्यांनी स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



