कराड:-आणे गावातील ज्येष्ठ नागरिक कै.पार्वती देसाई यांचे दुःखद निधन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आणे गावातील ज्येष्ठ नागरिक कै. पार्वती देसाई यांचे दुःखद निधन.

कराड : आणे, ता. कराड येथील ज्येष्ठ नागरिक कै. श्रीमती पार्वती निवृत्ती देसाई यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आणे गावात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
कै. पार्वती देसाई या प्रेमळ, मनमिळावू व संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवत सामाजिक जिव्हाळा जपला होता. त्यांच्या जाण्याने देसाई परिवारासह गावातील नागरिकांनी एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त शाखा अभियंता श्री उत्तम निवृत्ती देसाई, श्री रमेश निवृत्ती देसाई व श्री बाळासाहेब निवृत्ती देसाई (सर) यांच्या मातोश्री होत. तसेच त्या तुषार उत्तम देसाई (IPS) यांच्या आजी होत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त होत आहे.
रक्षाविसर्जन : रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आणे, ता. कराड येथे होणार आहे.




