आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

पणजी:-डिजिटल मीडिया संघटनेचे पणजी गोवा तिसरे राष्ट्रीय महा अधिवेशनाला दिमाखदार सुरुवात…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

डिजिटल मीडिया संघटनेचे पणजी गोवा तिसरे राष्ट्रीय महा अधिवेशनाला दिमाखदार सुरुवात…

(अजित जगताप)

पणजी दि: महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वाढत्या प्रभावामुळे डिजिटल मीडियाची ताकद वाढली आहे. त्यामुळे सोमवार दिनांक 4 मे रोजी कला अकादम पणजी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कला अकादमी येथे महा अधिवेशनाचे उद्घाघाटन होणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार डिजिटल मीडिया व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी वैचारिक प्रबोधन व पत्रकारांच्या समस्या आणि पर्यटन अशा तिहेरी उद्देशाने महा अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला दिमाखदार सुरुवात झाली आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होत आहे. या राष्ट्रीय महाअधिवेशनाची जोरदार तयारी पूर्ण झालेली आहे. उद्घाघाटन सकाळी १० वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, स्वागताध्यक्ष गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोवा राज्याचे कला व संस्कृती, क्रीडामंत्री रमेश तवडकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे,आयुष्यभान भारत योजनेचे महाराष्ट्र नोडल अधिकारी डॉ. ओमप्रकाश शेटे , गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर,खासदार सदानंद शेठ तानावडे, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते कार्यक्रम होत आहे.
सोमवार दिनांक ४ मे रोजी सकाळी १० वाजता माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष राजा माने व संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत व राज्य सचिव विकास भोसले पत्रकारांच्या समस्या व उपाय योजनेबाबत राज्य शासनाकडे जोरदार मागणी करणार आहेत. यावेळी सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील,महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत, मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत देशमुख,महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय भैरे,सागर चव्हाण, कोकण विभाग अध्यक्ष रुपेश पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, विलास ओव्हाळ, संजय कदम, संदीप पवार, प्रकाश कुंभार, दादा वाकडे, सचिन भिलारे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील माण ,खटाव, जावळी ,फलटण, सातारा, कराड व इतर भागातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होण्यासाठी आले होते. त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था संघटनेमार्फत करण्यात आली होती.
डिजिटल मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक, तेलंगाना,आंध्र प्रदेश,पंजाब, दिल्ली या राज्यातून हजारो संपादक पत्रकार पणजी नगरीत आले आहेत. या महाअधिवेशनात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत संपादक व मध्यम तज्ञ राजा माने हे घेणार आहेत . यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी या पुरस्काराची घोषणा राजा माने यांनी केली. महाअधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून पणजीतील ज्येष्ठ संपादक आणि माजी माहिती आयोगाचे आयुक्त संजय ढवळीकर, ॲड. संदीप कायदे (पंढरपूर ) यांचे ’अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’, ॲड.नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांचे ’समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळा’…,सौमित्र देसाई, पूणे,यांचे एआय चा डिजिटल मीडियातील प्रभावी वापर या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मीडियातील विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे ठराव यावर चर्चा करून अंतिम मसुदा सादर केला जाणार आहे.
पणजी गोवा येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, या महाधिवेशनाचा फायदा देशभरातील डिजिटल मीडियातील संपादक पत्रकारांना खूप चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला.

 

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय वतीने पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त मान्यवर

1) श्री. कमलाकांत तारी,(गोवा ) गोवंश
संवर्धक

2) डॉ. महुवा साह,(गोवा )
शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी

3) आमदार निलेश राणे , कुडाळ (विधिमंडळ उत्कृष्ट कार्य )

4)श्री. कमलेश बांदेकर, (गोवा )
योग प्रसारक

5)श्री दीपक नार्वेकर,(गोवा )
उत्कृष्ट प्रशासन

6)श्री. गुरुप्रसाद पावसकर, (गोवा )
आयुक्त, दिव्यांग संचालनालय

7) सौ. नेहा आंग्रे,गावस, (गोवा )
समाजसेवा

8) मा.प्रकाश कुलकर्णी,मुंबई ( कृषी )

9)मा. माणिक तुकाराम शेडगे सातारा ( सामाजिक कार्य )

10) मा. सौ.चित्राताई क्षीरसागर ,गोवा ( कवयित्री व साहित्यिक )

11) मा.निलेश भगवान सांबरे पालघर ( ग्रामसेवा )

12) प्रा. विशाल गरड,बार्शी ( प्रबोधन )

13)सौ. राधा उत्तरेश्वर खताळ, वडवणी बीड( कार्यक्षम सरपंच )

14)मा. गोवर्धन दराडे ,बीड ( अनाथ संगोपन )

15)मा. संतोष ठोंबरे , बार्शी ( उद्योग)

16) मा. पद्मज गुप्ता, नागपुर ( गो सेवा )

17) मा.राकेश अग्रवाल , मुंबई ( सामाजिक )

18) मा. राजेंद्र पाठक ,मुंबई ( बाल मदत )

19) मा. विकास देशमुख , मुंबई ( आरोग्य सेवा)

20) ग्रामविकास नागझरी
( जलसंधारण व ग्रामविकास संस्थात्मक पुरस्कार )
________________________________

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button