पाडळी :-(सातारा)-कोरफड शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाडळी :-(सातारा)-कोरफड शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल.

सातारा तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:- दख्खन चा राजा जोतिबा देवस्थान असलेले पाडळी गावातील सर्व उत्कृष्ट असे मानले जाणारे पाडळी गावचे बागायतदार श्री ऋषिकेश ढाणे साहेब यांनी त्यांच्या शेतात कोरफडीची मोठया प्रमाणात लागवड केली असून त्यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना सांगितले की पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आता अनेक शोतकरी कोरफड शेतीकडे वळताना दिसत आहेत. कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारे हे पिकं शेतकऱ्यानं साठी फायदेशीर ठरत आहे. कोरफडचा वापर औषधी, तसेच आरोग्य विषयक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बाजारात याला चांगली मागणी आहे.
कोरफड लागवडीसाठी फार सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. हलक्या व मध्यम जमिनीत ही है पीक चांगले बसते तसेच एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वेळा उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार खर्च करावा लागत नाही. कमी पाणी, कमी मेहनत आणि बाजारपेठेतील मागणी मुळे कोरफड शेती शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन ठरत आहे. कोरफड शेतीची माहिती देताना प्रमुख उपस्थिती म्हणुन नागठाणे गावचे सुपुत्र पंचायत समिती विद्यमान सदस्य श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे पाटिल,तालुका कृषी अधिकारी जयदीप ढगे नागठाणे गावचे मंडल अधिकारी श्री. पवार साहेब, पाडळी गावचे पोलीस पाटिल गुरव मॅडम, कृषी अधिकारी ढाणे साहेब , नागठाणे विकास सो.माजी चेअरमन आणि प्रगतशील बागायतदार श्री.गोरख शिवाजी यादव, श्री.अमोल विश्वास नलवडे सर यांनी बागायतदार ऋषिकेश ढाणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या




