सातारा:-महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री.विशाल संताजी घोरपडे व सचिवपदी श्री.चंद्रकांत तोरणे यांची निवड !
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री.विशाल संताजी घोरपडे व सचिवपदी श्री.चंद्रकांत तोरणे यांची निवड !

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्षपदी श्री.विशाल घोरपडे यांची तर जिल्हा सचिवपदी श्री.चंद्रकांत तोरणे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया सातारा जिल्ह्याचे मार्गदर्शक श्री.राजेंद्र पवार श्री.मनोहर यादव आणि महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
श्री. विशाल घोरपडे यांची सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. विशाल निकम श्री. सुमित भंडलकर व कार्याध्यक्ष पदी श्री. केतन भिसे सचिवपदी चंद्रकांत तोरणे सहसचिव पदी श्री.सौरभ चव्हाण,श्री.अनिकेत शिंदे खजिनदारपदी श्री. राहुल सावंत ,सातारा जिल्हा संघटकपदी श्री.दिपक ढाणे श्री. प्रदीप शेळके श्री. प्रकाश भोसले श्री.अजिंक्य जांभळे श्री. तुषार घाडगे यांची निवड झाली आहे. तसेच सातारा जिल्हा समन्वयक श्री मयूर संकपाळ,सातारा जिल्हा सदस्य सौ. रसिका सापते सौ.अनिता गायकवाड सौ पूजा पवार कुमारी शुभदा झनझणे सौ. अकाशी पाटील श्री रवींद्र मोहिते श्री.हृषीकेश पवार सौ. पिंकू खिलारे श्री.सनी जाधव श्री.सुरज नवसे श्री.धुळा कोळेकर
श्री.नामदेव गुरव, श्री. कोंडीबा वीरकर श्री. राहुल लोखंडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री.अक्षय आर्डे तर सातारा जिल्हा सह प्रसिद्धी सचिव श्री. विकास माने श्री. रियाज अत्तार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा कार्यकारणी नुकतीच पार पडली.
कार्यकारणीची निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक श्री. राजेंद्र पवार
श्री. मनोहर यादव आणि महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगे व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




