आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई नगर परिषदेत आंबेडकर जयंती उत्सवात उत्साहाची लाट; महामानवाला कृतज्ञ अभिवादन.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई नगर परिषदेत आंबेडकर जयंती उत्सवात उत्साहाची लाट; महामानवाला कृतज्ञ अभिवादन.


वाई : वाई नगर परिषद कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साह, अभिमान आणि जल्लोषात अभिवादन कार्यक्रम पार पडला.
महामानवाच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष श्री अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्री घनश्याम उर्फ पिंटू चक्के, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, विरोधी पक्ष नेते विजय ढेकणे यांच्यासह नगरसेवक प्रसाद बनकर, अजित शिंदे, भारत खामकर, संग्राम सपकाळ, सुशील खरात, नूतन मालुसरे, शब्बीर पठाण, सचिन सावंत यांची ठळक उपस्थिती होती.
कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, सुनील साठे तसेच सर्व पदाअधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश बुलंद करत महामानवाला कृतज्ञ अभिवादन केले.

2) “वाईत समरसतेचा महास्फोट!” बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त किसान वीर चौकात अभिवादनाचा ऐतिहासिक सोहळा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता गतिविधी, वाई यांच्या वतीने शहरातील किसान वीर चौक येथे भव्य अभिवादन कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र प्रांत समरसता मंडळ सदस्य श्री. राजेश मठपती उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. अनिल सावंत यांनी मान्यवरांची शोभा वाढवली.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. श्री. विवेक शिंदे यांनी प्रमुख पाहुणे व वक्त्यांचा परिचय करून दिला, तर कार्यक्रमाचे प्रभावी प्रस्ताविक श्री. सुधीर सूर्यवंशी (समरसता गतिविधी संयोजक, वाई तालुका) यांनी केले.
यावेळी समरसता प्रतिज्ञा श्री. करुणानिधी यादव यांनी दिली, तर बुद्ध वंदना श्री. गणेश पुजारी यांनी सादर केली. विविध संघटनांच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले. यादी वाचन श्री. मंगेश सकटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीधर पंडित यांनी केले. या कार्यक्रमास तालुका कार्यवाह श्री. शैलेश सकटे, उपखंड प्रमुख श्री. अंगद राय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी वाई शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व आर्थिक संघटनांच्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. माता भगिनी, जेष्ठ स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button