नवी दिल्ली महिला अधिकारी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेच्या लेखाने नवा वाद…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नवी दिल्ली महिला अधिकारी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेच्या लेखाने नवा वाद…

(अजित जगताप)
नवी दिल्ली दि: वारकरी संप्रदायाच्या चळवळीमध्ये प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत आहे. या प्रवृत्तीमुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे. असे परखड मत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी अखिल महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित सौदामिनी या स्मरणिकेत लिहिलेले लेखात केल्याने चांगलाच नवा वाद पेटला आहे.
.नवी दिल्ली येथे ११-१२ एप्रिल २०२६ रोजी महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. सरहद संस्था (पुणे), नवीन महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे होत्या . हे संमेलन छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीनिमित्त, प्रशासकीय सेवेतील महिलांच्या साहित्याला मंच देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या सोहळ्याला महिला अधिकाऱ्यांनी लिहिलेले लेख कविता यांचे स्मरणिका ‘सौदामिनी’ या स्मरणिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय पातळीवर
प्रशासकीय कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या अनुभवांना व्यासपीठ देणे, कविता आणि परिसंवादांतून महिलांचे प्रश्न मांडणे “प्रशासनातील अनुभव आणि साहित्य निर्मिती”, “महिला सक्षमीकरण आणि लेखन”, गझल सादरीकरण, आणि कवयित्रींचे काव्यवाचन असे कार्यक्रम झाले. महिला अधिकाऱ्यांना सचिव पदासाठी मंत्री डावलतात. असा आरोप राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनीही लेखात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. त्याची चर्चा सुरू आहे.
या पहिल्याच ऐतिहासिक संमेलनामुळे प्रशासकीय सेवेतील महिलांच्या साहित्यिकाचा सन्मान करण्यात आला होता . हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले आहे. या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय (निवृत्त) अधिकारी १९७४ बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्या लीना मेहेंदळे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी केली आहे.
या महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या सौदामिनी या स्मरणिकत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी खास करून महिला अधिकारी अंधश्रद्धेच्या व बुवाबाजीच्याच चक्रात अडकून पडलेले आहेत. वारकरी मध्ये प्रत्येकांनी लोकांचे घुसखोरी झाली असून महिलांना विशेषता शासकीय अधिकाऱ्यांनी वारकरी संप्रदायाच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपला पाहिजे. अशी भूमिका मांडली आहे. या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे. पुरोगामी चळवळी हे विश्वच माझे घर असे मानते. तर काही प्रतिगामी हे मनुस्मृति ग्रंथाच्या आधार घेऊन आजही प्रतिगामी विचार जपतात. अशी आता टीका होऊ लागलेली आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी जाहीर पणाने घेतलेल्या या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे. ज्येष्ठ साहित्यिका व प्रशासकीय सेवानिवृत्त अधिकारी लीना मेहंदळे या महाराष्ट्रातील खानदेशांमधील कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या भूमीतून जन्म घेतलेल्या पुरोगामी लेखिका संमेलनाच्या अध्यक्ष लाभले असल्यामुळे ज्येष्ठ नेते श्री पवार यांच्या लेखाला महत्त्व प्राप्त आलेले आहे. संपूर्ण देशामध्ये आता प्रतिगामी वारे वाहत असताना पुरोगामी विचारांची झुळकच अनेकांना आकर्षित करू लागलेली आहे.
या संमेलनासाठी महाराष्ट्र सदनला आगाऊ कल्पना देऊनही काहींची व्यवस्था होऊ शकलेली नाही. नूतनीकरण व संमेलनाच्या कार्यक्रमाचे निमित्त सांगून प्रवेश नाकारला असला तरी अनेकांनी महाराष्ट्र सुद्धा भेट देऊन युगपुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केले. खास करून सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत रेल्वे अधिकारी प्रेमानंद जगताप, सामाजिक कार्यकर्ते अँड .संजय गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप शहाजी गुजर व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पातळीवर काम करणारे सच्चे आंबेडकरवादी श्री नितीन कांबळे आदी मान्यवर या वेळेला महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे उपस्थित होते.




