नेवासा:-देवगड संस्थानचे महंत भास्करागिरी महाराजांना मातृशोक.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

देवगड संस्थानचे महंत भास्करागिरी महाराजांना मातृशोक.

श्रीरामपूर प्रतिनिधी संजय पगारे
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्यावर मातृशोक कोसळला असून संपूर्ण भक्तपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देवगड संस्थान परिसरात शोककळा पसरली आहे. त्या ९९ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात
➡️ सुपुत्र – ह.भ.प. भास्करगिरी महाराज व मधुकर पेसोडे
➡️ कन्या – कमलबाई रायपुरे
असा परिवार आहे.
🕊️ अंत्यविधी आज
स्व. सरुबाई पेसोडे यांचा अंत्यविधी आज रविवार दि. ___ रोजी सायंकाळी ४:३० वाजता श्री क्षेत्र देवगड संस्थान परिसरात करण्यात येणार आहे.
त्यांच्या निधनामुळे धार्मिक, सामाजिक व भक्तवर्गात शोक व्यक्त केला जात असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.




