रांजणगाव:-(पारनेर)-श्री स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्री स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप!

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार इकडे
पारनेर -( राजकुमार इकडे)
दि १२ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील ,श्री शिवाजी विद्यालयातील ,गरजु विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना श्री स्वामी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राज देशमुख यांचे हस्ते सुमारे पन्नास सायकलचे वाटप करण्याप आले,
श्री स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राज देशमुख हे अखंड महाराष्ट्र भर समाजसेवेचे काम करीत असुन ते आपले पनाची चळवळ हा विचार सर्व सामान्यां पर्यत पोहचला पाहीजे.अशी माणसिकता ठेवुन महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ,गरीब गरजु विद्यार्थी- विद्यार्थींनी यांना सायकल वाटप करण्यात आले,
सायकल वाटप कार्यक्रमाला आवांतर खर्चाला फाटा देऊन ,सर्व औपचारीकता बाजुला ठेऊन ,सावित्राबाई च्या लेकीशी संवाद ,नाट्य स्वरुपात उच्चशिक्षीत होण्याचे अवहान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राज देशमुख यांनी केले.
कार्यक्रमासाठी रांजणगावचे सरपंच महेश देशमुख, प्रियंकाताई शिंदे पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास बनकर ,प्रताप ठोकळ, श्रीकांत येणारे,वसंत बुळकुंडे ,सुवर्णाताई पांडे,सुजाता येणारे आणी पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री शाम औटी यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री बापुसाहेब सलगर सर यांनी केले.




