शिवडी:-(मुंबई)-सभागृह उपनेते पदी दमदार निवड – शिवडीत जल्लोष!
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिवडी:-(मुंबई)-सभागृह उपनेते पदी दमदार निवड – शिवडीत जल्लोष!

प्रभाग क्रमांक २०६ चे सन्माननीय, कार्यसम्राट आणि लोकप्रिय नगरसेवक श्री.सचिन भाऊ पडवळ यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महानगरपालिका मुख्यालयातील सभागृह उपनेते या मानाच्या पदावर निवड झाल्याने शिवडी परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेणारे, विकासकामांमध्ये सातत्याने आघाडीवर असलेले आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नातं जपणारे सचिन भाऊ पडवळ यांची ही निवड म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
या निवडीमुळे प्रभाग क्रमांक २०६ चा आवाज आता महानगरपालिका सभागृहात अधिक प्रभावीपणे घुमणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवडी परिसराचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल शुभेच्छुक कृष्णानंद भट, विजय काळे, तसेच बी.डी.डी. चाळीतील रहिवासी, अखिल शिवडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्त, शिवसेना शाखा क्र. २०६ मधील पदाधिकारी, गटप्रमुख, शिवसैनिक महिला व पुरुष यांनी सचिन भाऊंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सर्व स्तरातून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
🔥 “जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास – सचिन भाऊ पडवळ यांचाच विजय खास!”
🚩 “शिवडीचा अभिमान – सभागृहात गाजणार आता सचिन भाऊंचा आवाज!”
💥 “कामगारांचा नेता, जनतेचा आधार – पडवळ भाऊंचा झंझावात अपार!”
🙏 जय साई राम | जय महाराष्ट्र! 🚩




