ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाईत भाजपचा 46 वा स्थापना दिवस उत्साहात; विकास, राष्ट्रसेवेचा संकल्प पुन्हा दृढ!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईत भाजपचा 46 वा स्थापना दिवस उत्साहात; विकास, राष्ट्रसेवेचा संकल्प पुन्हा दृढ!

वाई प्रतिनिधी :
वाई शहरात भारतीय जनता पार्टी चा 46 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष श्री. अनिल सावंत, सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा व पंचायत समिती सदस्य सुरभीताई भोसले, विरोधी पक्ष नेते व वाई शहर भाजप अध्यक्ष विजय ढेकाणे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते विजय ढेकाणे यांनी सांगितले की, ६ एप्रिल हा दिवस केवळ दिनांक नसून राष्ट्रनिष्ठा आणि देशसेवेचा संकल्प दिवस आहे. सन १९८० मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी पक्षाची स्थापना केली. “अंधकारातून प्रकाशाकडे” नेण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला असून भाजप आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो.
ते पुढे म्हणाले की, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” हा पक्षाचा मूलमंत्र असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी उंची गाठली आहे. डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, गरीब कल्याण यांसारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक स्तरावर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत आहे.
यावेळी सुरभीताई भोसले यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, पक्षाची खरी ताकद ही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहराच्या विकासावर भर देत सांगितले की, वाई ही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरा असलेली नगरी असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम सुरू आहे.
ते म्हणाले की, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत वाईला आदर्श शहर बनवण्याचा संकल्प आपण केला आहे. प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधा पोहोचवणे, युवकांना संधी देणे आणि नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी देशहित सर्वोच्च मानून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करण्याचा आणि वाई शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प केला. तसेच सर्वांना स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button