खटाव:-वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यातून क्षितिजने गाठले एक पाऊल पुढे,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यातून क्षितिजने गाठले एक पाऊल पुढे,,,,
वडूज दि: खटाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तथा वडूज येथील सदिच्छा हॉस्पिटलचे डॉ. संतोष मोरे हे वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध उपक्रम राबवतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव कुमार क्षितिज मोरे यांनीही सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे .वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक व इतरांच्या आरोग्य शिबीर घेऊन एक चांगला वाढदिवस साजरा केला आहे.
अवघे १४ वर्षे वय असलेल्या नवीत शिक्षण घेत असलेल्या कुमार क्षितिज मोरे हा आपला वाढदिवस साजरा करताना सामाजिक जाणीव ठेवत आहे. दरवर्षी विविध उपक्रम राबवत असताना समाजाला आपल्या वाढदिवसाचा उपयोग व्हावा. हा त्या पाठीमागे हेतू असतो. आश्रम शाळांना अन्नदान, वृक्षारोपण, सॅनिटायझर व मास्क वाटप तसेच गरजू लोकांना आर्थिक अडचणीमुळे आपले आरोग्य राखण्यासाठी अडचणी येतात .अशा गरजू रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.
मुळगाव पेडगाव ता. खटाव येथीलही गावच्या विकासासाठी जल अभियान तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातूनही या चिमुकल्या हाताने सहकार्य केले आहे. लहानपणापासूनच घरातच सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक बाल गोपाळ तसेच आबालवद्धांनी शुभेच्छा देऊन त्याच्या हस्ते अनेक विधायक उपक्रम राबवण्यासाठी त्याला दीर्घायुष्य लाभो. अशी सदिच्छा व्यक्त केली आहे .
सध्या सर्वत्र नेत्यांचे वाढदिवस म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी, मनोरंजनाचे कार्यक्रम, एकमेकांना केक भरविण्याऐवजी तोंडावर केक फासणे, सार्वजनिक ठिकाणी फटाक्याचे धूर, गोंधळ घातला जातो. याला संपूर्ण फाटा देऊन अत्यंत शांततापूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा होत असल्याने लोकांनी ही मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
————————————————————
फोटो – सामाजिक जाणीव ठेवून वाढ दिवस साजरा करणारा क्षितिज मोरे (छाया – सूरज पोतदार, वडूज)