शिर्डी:-शिर्डीत साई भक्ताची फसवणुक साई संस्थानच्या त्या कर्मचा ऱ्या विरोधात गुन्हा दाखला.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष
शिर्डीत साई भक्ताची फसवणुक साई संस्थानच्या त्या कर्मचा ऱ्या विरोधात गुन्हा दाखला.
श्रीरामपुर – Rps स्टॉर न्युज प्रतिनिधी – देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त येत असतात दर्शनासह साईच्या झोळीत दान ही टाकतात
मात्र . याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे साई भक्त ने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणुक करणाऱ्या कर्मचाऱ्या वर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थान ला एक निनावी पत्र प्राप्त झाले होते
या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक के कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना दिलेल्या रकमेच्या दोन भाग करून पावत्या देतोय आणि त्यातील एक बनावट असते. बनावट पावतीची संस्थानाकडे नोंद होत नाही त्या रकमेचा अपहार केला जातो . असे नमूद केले होते साईबाबा संस्थानने याबाबत चौकशी केली असता या कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्या ने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला . या प्रकरणी साई बाबा संस्थानये प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे