महाबळेश्वर:-“दुर्गम भागाला जीवनदान! रामेघरमध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण – जनतेसाठी धावणारी सेवा”
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“दुर्गम भागाला जीवनदान! रामेघरमध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण – जनतेसाठी धावणारी सेवा”

तालुका प्रतिनिधी उत्तम भालेराव
रामेघर तालुका महाबळेश्वर: दुर्गम भागातiल नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने आज रामेघर येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषद नव्याने निवडून आलेले सदस्य श्री. अजित संकपाळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला आहे.
आपला भाग डोंगराळ व दुर्गम असल्यामुळे अनेकदा आजारी नागरिकांना तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येत होत्या. हीच अडचण ओळखून समाजहिताच्या भावनेतून ही रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असून, आता नागरिकांना जीव वाचवणारी मदत वेळेत मिळणार आहे.
या लोकार्पणामुळे केवळ एक वाहन नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून विकासाची गती वाढवण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.
यावेळी रामचंद्र येथे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात करण्यात आला होता या धार्मिक कार्यक्रमाला जि.प. सदस्य श्री अजित सपकाळ सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उतेकर, सागर कदम आनंद धनावडे,रामेघरचे सरपंच सुनील कदम शिवसेनेचे नेते शंकर दादा कदम व मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे रामेघर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
“ही रुग्णवाहिका म्हणजे केवळ सेवा नाही, तर प्रत्येक गरजू माणसासाठी धावणारे जीवन आहे!”




