कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-सुपा एम आय डी सी मध्ये फायर ऑडिट मध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सुपा MIDC मध्ये फायर ऑडिट मध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

 प्रतिनिधी राजकुमार इकडे

पारनेर- सुपा (राजकुमार इकडे)
सुपा एम आय डी सी मध्ये मोठ्या संख्येने नवीन उद्योजक करोडोंची गुंतवणूक करुन उद्योग सुरू करत आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे पारनेर तालुक्यात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असे असताना उद्योजकांनी आपल्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपल्या करोडोंच्या उद्योगांच्या सुरक्षेसाठी हलगर्जीपणा पणा करून चालणार नाही सुदैवानं कंपनी मध्ये दुर्दैवी घटना घडली नाही तर चांगलेच पण जर दुर्दैवाने आगी सारखी दुर्दैवी घटना घडली तर होणाऱ्या नुकसानीला विमा वगैरे भेटेल ही पण दुर्दैवाने जिवितहानी झाली तर याला जबाबदार कोण….? सुपा एम आय डी सी मध्ये अनेकदा वेगवेगळ्या कंपनी मध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पण अशा घटना रोखण्यासाठी घटना घडण्याआधी कंपनी मध्ये फायर यंत्रणा कार्यान्वित असणं बंधनकारक असताना सुद्धा कंपनी मालक या गोष्टींकडे दुर्लक्ष का करतात आणि महत्त्वाचे म्हणजे प्रशासन सुद्धा अशा कंपन्यांना लायसन्स कसं देतं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी उपस्थित केला यांचाच अर्थ आर्थिक चिरीमिरीत गुंतलेले झोपेचं सोंग घेऊन झोपलेले हे अधीकारी या अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर तरी जागे होणार की नाही…?असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही गांभीर्याने घेत विचार करणं गरजेचं आहे.
चौकट ~ सुपा एम आय डी सी मधील सर्व कंपन्यांचे फायर ऑडिट होणं गरजेचं आहे कंपनी मध्ये फक्त नावालाच लायसन्स काढण्यासाठी तकलादू स्वरूपात फायर यंत्रणा उभी केली जाते पण प्रत्यक्षात वेळ प्रसंगी ती सक्षम नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे त्यामुळे अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडल्या जातात प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सुदैवानं जिवितहानी घडली नाही पण याकडे गांभीर्याने पहात विचार करणं गरजेचं आहे फायर यंत्रणा कार्यान्वित नसताना सुद्धा आर्थिक चिरीमिरीत यांना लायसन्स देणाऱ्या आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन कारवाई होणं गरजेचं आहे.
अविनाश मुरलीधर पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button