राहता तालुक्यात महिला नेतृत्वाची नवी पहाट; रुपाली भालेराव यांची महिला अध्यक्षपदी निवड.
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहता तालुक्यात महिला नेतृत्वाची नवी पहाट; रुपाली भालेराव यांची महिला अध्यक्षपदी निवड.

जिल्हा प्रतिनिधी आदिनाथ कडू
लोणी |
राहता तालुक्यातील सामाजिक व संघटनात्मक घडामोडींना नवी दिशा देणारी एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. “स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार सौरक्षक संघटना”च्या वतीने आयोजित या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकमताने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीस अहिल्यानगर सरचिटणीस उमेश पन्हाळे, राहता तालुका कार्याध्यक्ष आबा (संपत निर्मळ), तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे तसेच सदस्य श्रीपाद बोकंद, राजेंद्र पिंपळे आणि अक्षय संजय जोंधळे उपस्थित होते.
बैठकीत सर्वांच्या एकमताने राहता तालुका महिला अध्यक्षपदी रुपाली निलेश भालेराव यांची निवड करण्यात आली. हा ठराव पुढील मंजुरीसाठी वरिष्ठ पदाधिकारी चंद्रकांतदादा वेदपाठक यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी रुपाली भालेराव यांच्या समाजकार्याची दखल घेत या निवडीस तात्काळ मान्यता दिली.
पत्रकारांशी संवाद साधताना कार्याध्यक्ष आबा (संपत निर्मळ) यांनी सांगितले की, “रुपाली ताई नेहमीच गोरगरीब व वंचित घटकांसाठी कार्यरत असतात. त्या तळागाळातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. महिला अध्यक्ष म्हणून त्या कार्यभार सांभाळतील, तर महिलांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सुटतील. आजच्या काळात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत; त्यांना संधी देणे हीच खरी प्रगती आहे.”
या निवडीच्या निमित्ताने उमेश पन्हाळे, ज्ञानेश्वर साबळे आणि श्रीपाद बोकंद यांनी रुपाली भालेराव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राहता तालुक्यात रुपाली भालेराव यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि संघटनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




