पुणे:-दहावीच्या पेपरफुटीचा खोटा सापळा; टेलिग्रामवर विद्यार्थ्यांची हजारोंची लूट!”
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दहावीच्या पेपरफुटीचा खोटा सापळा; टेलिग्रामवर विद्यार्थ्यांची हजारोंची लूट!”

हवेली प्रतिनिधी प्रमोद काळे
पुणे : दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांची हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश झाला आहे. टेलिग्रामवर बनावट ग्रुप तयार करून पेपरफुटी झाल्याचा खोटा दावा करत विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने टेलिग्रामवर “लीक पेपर” देण्याच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांना संपर्क केला. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी सुमारे ५०० ते ६०० रुपये मागितले जात होते. परीक्षेची भीती आणि पेपर आधी मिळवण्याच्या मोहामुळे काही विद्यार्थ्यांनी पैसेही भरले.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून प्रत्यक्षात कोणतीही पेपरफुटी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी विद्यार्थ्यांना पासवर्ड लावलेली पीडीएफ फाइल पाठवत असे आणि परीक्षेनंतर त्याच फाइलमध्ये खरा पेपर अपलोड करून “पेपर आधीच दिला होता” असा बनाव करत असे.
दरम्यान, शिक्षण मंडळ आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून आणखी किती विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.




