सातारा:-नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्यमान पंचायत समिती सदस्य यांची भेट.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

सातारा:-नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्यमान पंचायत समिती सदस्य यांची भेट.

सातारा प्रतिनिधी महेश मोहिते
पंचायत समिती सदस्य मा. श्री. संतोष साळुंखे साहेब , ग्रामपंचायत सदस्य श्री.दत्तात्रय साळुंखे, वर्धनआग्रो चे संचालक श्री.अविनाश साळुंखे, चेअरमन श्री.गोरखनाथ यादव व ज्येष्ठ नागरिकांन सोबत नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.महेश जगाडे, डॉ.महालकर मॅडम व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना योग्य व तत्पर सेवा मिळावी, तसेच आवश्यक औषधे व सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदस्य यांचा सत्कार केला. तसेच सदस्यांनी यापुढे तुम्हाला लागेल ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.




