नागठाणे MSEB केंद्राच्या कामकाजाचा पंचायत समिती सदस्यांनी घेतला आढावा.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

पाचशे अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे MSEB केंद्राच्या कामकाजाचा पंचायत समिती सदस्यांनी घेतला आढावा.

सातारा प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:- शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (MSEB) नागठाणे कार्यालयास पंचायत समिती सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी धावती भेट देत येथील वीज पुरवठा व कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी वीज पुरवठा कार्यालयातील अधिकारी श्री.पाटील साहेब व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी,गावातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या वीज सेवेबाबत माहिती घेतली. तसेच वीज पुरवठा अधिकारी पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा लाईटची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचायत समिती सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे व शेतकऱ्यांनी पाटील साहेब व कर्मचारी यांचे अभिनंदन केले सदस्य यांनी वीज पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागठाणे पंचक्रोशीत येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणीस लागेल ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.




