ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा :-वाई शहरातील नवीन कृष्णा फुल वाहतुकीसाठी खुला.

प्रतिनिधी:- निलेश मोरे :-839 0501946

वाई दि.7 प्रतिनिधी

*वाई शहरातील नवीन कृष्णा पुल वाहतुकीसाठी खुला*

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा नदीवर जुना ब्रिटीशकालीन पुल वाई शहराला जोडण्याचे काम करत होता.या पुलाची कालमर्यादा संपून बरिच वर्ष झाली होती तसेच हा पुल वाहतुकीसाठी अरुंद होता.या सगळ्या गोष्टींचा विचार करुन आमदार मकरंद आबा पाटील यांनी स्वतः या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देऊन वाईकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
सहा महिन्यापूर्वी या पुलाचे काम सुरू झाले होते. त्याच्या प्रत्येक बारकाव्याकडे आमदार मकरंद आबा पाटील जातीने लक्ष देत होते. वाईकरांना दिलेला शब्द आणि होणारी गैरसोय या सगळ्यांमुळे आबा सतत पुलाचा पाठपुरावा करत,काम लवकर व दर्जेदार व्हाव यासाठी आबा प्रशासनाला सतत सुचना करत
अखेरीस वाईच्या सौंदर्यात भर टाकणारा हा दैदिप्यमान नवा पुल वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला, त्याची लांबी 80 मिटर तर रुंदी 12 मीटर इतकी भव्य आहे. वाईकरांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधान उद्घाटनप्रसंगी आमदार मकरंद आबा पाटील यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.
प्रसंगी जेष्ठ नेते प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ,अनिल सावंत, संजय लोळे, भुषण गायकवाड,भैया डोंगरे,अॅड.श्रीकांत चव्हाण, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, भारत खामकर, प्रदीप जायगुडे, बाळासाहेब चिरगुटे, मदन भोसले, धनंजय बनकर, निलेश काका मोरे,ई कार्यकर्ते मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, पो नि बाळासाहेब भरणे उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button