मायणी:-श्री सद्गुरु यशवंत बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. ८ पासून यात्रोत्सवास प्रारंभ – १५ मार्च रोजी रथ सोहळ्याचे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्री सद्गुरु यशवंत बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. ८ पासून यात्रोत्सवास प्रारंभ – १५ मार्च रोजी रथ सोहळ्याचे आयोजन.
सातारा प्रतिनिधी – प्रा.दिलिप पुस्तके
मायणी ता. खटाव येथील श्री संत सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या ९५ व्या पुण्यतिथी सोहळ्यास भक्तीमय व उत्साह पूर्व वातावरणात प्रारंभ झाला असून दि. ८मार्च ते १८ मार्च अखेर रथोत्सव व यात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि. १५ मार्च रोजी मुख्य रथसोहळा संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे सचिव द. ग. माने गुरुजी यांनी दिली.
सदर यात्रा नियोजनाची बैठक सुरेंद्र गुदगे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले.आज रविवार दि. ८ मार्च रोजी सद्गुरु यशवंत बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने यशवंत बाबा मंदिरात फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्ताने मंदिरात ह.भ.प.विजय महाराज शिंदे यांचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवार दि. ९ रोजी पालखी सोहळा व भंडारा (खिरीचा प्रसाद ) कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. १५ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी रथ सोहळा संपन्न होणार आहे.
या निमित्ताने दि. १० मार्च ते १४ मार्च अखेर क्रिकेटचे भव्य सामने आयोजित करण्यात आले आहेत.
या दहा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी मेवा मिठाई, खेळणी, पाळणे, हॉटेल्स, महिलांच्या दागिन्यांचे स्टॉल्स उभारण्यात येत आहेत.तसेच दि. ७ मार्च ते १४ मार्च अखेर मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने यात्रा कमिटीची निवड करण्यात आली असून चेअरमन मारुती तानाजी माने, व्हाईस चेअरमन विशाल चव्हाण, कृष्णात सोमदे, सचिव ओम साई जाधव, सचिन अशोक माने, सहाय्यक सचिव अनिकेत माळी अझरुद्दीन नद्दाफ ,खजिनदार निलेश दगडे किरण झोडगे, सहखजिनदार तानाजी पवार अमर मदने यांची निवड करण्यात आली आहे.
यात्रेचे योग्य पद्धतीने नियोजन व्हावे यासाठी रथ सजावट, मंदिर सजावट, कमान सजावट, दक्षता कमिटी, भंडारा कमिटी व पारायण सोहळा कमिट्यांची स्थापना करण्यात आली आहे.
मायणी ग्रामपंचायत ,श्री सद्गुरु यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट, वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर यात्रोत्सव संपन्न होणार आहे.




