आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिरगाव-(वाई)- येथे ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरगाव-(वाई)- येथे ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात.

वाई प्रतिनिधी सुरेखा भोसले
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, शिरगाव येथे माता-पालक व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या मा. कु. हर्षदाताई फरांदे (पंचायत समिती, वाई) उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रथम नागरिक मा. सरपंच सौ. दैवता भोसले होत्या.
यावेळी गावातील सर्व माता-पालक तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण तज्ञ, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. गायकवाड मॅडम, सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




