आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-धोममध्ये प्रशासनाचा थेट धडाका! ‘विधी सेवा महाशिबिरा’त १००+ अर्जांचा तात्काळ निपटारा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) धोममध्ये प्रशासनाचा थेट धडाका! ‘विधी सेवा महाशिबिरा’त १००+ अर्जांचा तात्काळ निपटारा.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई दि. ०४ : शासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवण्याच्या निर्धारातून धोम (ता. वाई) येथे भरविण्यात आलेल्या ‘विधी सेवा महाशिबिरा’ने प्रशासनाचा धडाका दाखवून दिला. एकाच छताखाली दाखले, उतारे आणि विविध शासकीय योजनांचे अर्ज स्वीकारत १०० हून अधिक प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाची लाट पसरली.

संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. योगेश खरमाटे आणि सोनाली मेटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे महाशिबिर पार पडले.
आकडेच सांगतात यशोगाथा!
डोमेसाईल दाखले – २५
डोंगरी दाखले – २५
उत्पन्न दाखले – २७
कुणबी दाखले – १२
७/१२ उतारे वाटप – ८३
शिधापत्रिकेत नाव दुरुस्ती – २३
नवीन आधार नोंदणी – १९
निराधार योजनेसाठी अर्ज – १३
विविध योजनांसाठी १००+ अर्ज स्वीकारले व निपटारा
कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ टाळून नागरिकांना त्यांच्या गावातच सेवा मिळाल्याने प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. खरमाटे यांनी नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, मंडळ अधिकारी श्रीकांत धनावडे, ग्राम महसूल अधिकारी शितल वाघ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी महाशिबिराच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
धोममध्ये भरलेल्या या महाशिबिरामुळे शासन-प्रशासन जनतेच्या खऱ्या अर्थाने ‘दारात’ पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

2) वाईत गटारांचा स्फोटक प्रश्न; ‘स्वच्छ शहर’चा दावा चिखलात!

वाई दि. ०४ : स्वच्छता आणि सुशासनाचे आश्वासन देत नव्या नेतृत्वाकडे शहराची धुरा सोपवलेल्या वाईकरांच्या अपेक्षांना तडे जाऊ लागले आहेत. ब्राह्मणशाही परिसर, ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक आणि गुलाबराव खामकर पथ या मार्गांवर तुंबलेल्या गटारांमुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी “स्वच्छ वाई”चा दावा चिखलात गेल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
दोन महिन्यांपूर्वी गटार सफाई झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणी करता गटारांमध्ये वाळू, प्लास्टिक कचरा आणि घाणीचा साठा असल्याने नाले पूर्णतः चोकअप झाले आहेत. दर काही दिवसांनी गटार ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर सांडपाणी साचते. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यधोका यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
किसनवीर कॉलेज रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून, “रस्त्यात गटार की गटारात रस्ता?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन बैठका आणि कागदोपत्री अहवालांपेक्षा प्रत्यक्ष कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
नळ कनेक्शनसाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्याच्या मधोमध मातीचे ढीग तसेच सोडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विविध प्रभागांतील लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाई नगर परिषद प्रशासनाने केवळ आश्वासने न देता गटारांची तातडीने साफसफाई करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप उफाळून येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

3) ‘एक हात मदतीचा’ची उज्ज्वल परंपरा; आसरे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद.


वाई दि. ०४ : रोहिडेश्वर शिक्षण संस्था संचलित, कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, आसरे (ता. वाई) येथे ‘एक हात मदतीचा’ या स्तुत्य उपक्रमांतर्गत विद्यार्थी दत्तक पालक योजना राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्ट्स ड्रेस व श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे वाटप करून संस्कार व शिक्षणाचा सुंदर संगम घडवण्यात आला.
या उपक्रमाची संकल्पना विद्यालयाचे कर्मचारी संतोष डगळे यांची असून, मुख्याध्यापक जाधव सर व शिक्षकवृंदाच्या सहकार्याने योजना साकारली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. महेश मेणबुदले यांनी, “शिक्षणासोबत अध्यात्माची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होतात,” असे प्रतिपादन केले.
विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था चे संस्थापक ह.भ.प. सुहास गवळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीता भेट दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. डॉ. मेणबुदले यांनी आपल्या वडिलांच्या (कै. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले) स्मरणार्थ ₹५,५५५/- विद्यालयास देणगी देत तीन विद्यार्थी दत्तक घेण्याची घोषणा केली.
मान्यवरांकडून मदतीचा ओघ
सिद्धार्थ पाटील (विकास अधिकारी, LIC वाई) – १ विद्यार्थी दत्तक
विकास जाधव (पत्रकार, दैनिक पुढारी) – १ विद्यार्थी दत्तक
विशाल सणस (संचालक, सर्वोदय सेवा ट्रस्ट) – १ विद्यार्थ्याचे ₹४,०००/- शुल्क जमा
निलेश पवार (माजी चेअरमन, धोम सोसायटी) – १ विद्यार्थी दत्तक
भिकू सणस – १ विद्यार्थी दत्तक
रमेश तायडे – वेळोवेळी मदतीचे आश्वासन
या सोहळ्यास सुरेश वाघ, बाबुराव चोरट, नितीन शेलार, नारायण दादा सणस, राजाराम कोंढाळकर, बाबुराव खंडू सणस, आनंदा कांबळे, अशोक बाजीराव सणस, शिवाजी पिसाळ, अनिल पवार, तुषार सणस, साहेबराव सणस, सुभाष वैराट, वसंत गाडेकर, सदाशिव सणस यांसह अनेक ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले, प्रभावी सूत्रसंचालन समीर सय्यद यांनी केले, तर आभार संतोष डगळे यांनी मानले.
‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असून, संस्कारक्षम आणि सुशिक्षित पिढी घडवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

4) वाई:-व्याजवाडीत संत सावता महाराजांचा दिव्य सोहळा; मंत्र्यांच्या हस्ते सभामंडप लोकार्पण, भाविकांची उस्फूर्त गर्दी.

वाई दि. ०४ : तालुक्यातील व्याजवाडी येथे दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तीमय वातावरणात संत सावता महाराज व श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण तसेच नूतन सभा मंडपाचे उद्घाटन दिमाखात पार पडले. संपूर्ण गावात हरिनामाचा गजर घुमत असताना भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
पुसेगावचे प.पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते विधीवत मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. ग्रामस्थांच्या सोयीसाठी उभारलेल्या भव्य सभामंडपाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. पाटील यांनी व्याजवाडी ग्रामस्थांच्या एकोप्याचे कौतुक करत, धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सलोखा आणि विकासाची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
सोहळ्यास राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या विशेष परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी झाला. सोहळ्यानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
व्याजवाडीत पार पडलेला हा सोहळा भक्ती, एकजूट आणि ग्रामविकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button