पुसेसावळी:-(कळंबी)-जिल्हा परिषद शाळा कळंबीमध्ये ‘श्यामची आई’ पारायणातून संस्कारांची जागर.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

जिल्हा परिषद शाळा कळंबीमध्ये ‘श्यामची आई’ पारायणातून संस्कारांची जागर.

पुसेसावळी (कळंबी ):- समाजात एकमेकांबद्दल आदर कुटुंबातील व्यक्तींच्या संदर्भात सन्मान वडीलधाऱ्यांच्या प्रति आदरभाव या गुणांचा सध्या ऱ्हास झालेला दिसत आहे तसेच विकृत पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन संस्काराची बीजे प्राथमिक शाळेतील संस्कारक्षम वयात रोवण्याच्या दृष्टीने नववर्ष ते शिवजयंती या कालावधीत जिल्हा परिषद केंद्र शाळा कळंबी येथे साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचे एक जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत पारायण करण्यात आले आपले आईप्रती स्नेहभाव निर्माण व्हावा आपल्या आईचे आपल्या जीवनातील स्थान आपले जीवन सुंदर होण्यासाठी घेतलेले कष्ट आणि एकंदरीतच आपली सामाजिक बांधिलकी या बाबींवर या पारायण वाचनाच्या दरम्यान प्रकाश टाकण्यात आला अतिशय लहान लहान प्रसंगातून आपण आपले कुटुंब आपले गाव आपले राष्ट्र याबाबत कसे संवेदनशील असले पाहिजे याची माहिती या आत्मकथनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य उपक्रम केंद्र शाळा कळंबी ना आयोजित केला होता.या उपक्रमा खटाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, केंद्रप्रमुख धनाजी पवार तसेच गावातील नागरिकांनी भेट देऊन याबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले श्यामची आई हे फक्त पुस्तक नसून जीवनामध्ये कशा पद्धतीने मार्गक्रमण करावे याबाबतचा एक अध्याय असल्यास मत यावेळी मुख्याध्यापक धनाजी थोरवे यांनी व्यक्त केले. यात पारायण कालावधीत पुस्तकातील रोज एक रात्र वाचून त्याबाबत मुलांनी टिपणे काढून आपल्या आई-वडिलांना सांगितला त्यामुळे पालकांनाही या उपक्रमाचे कौतुक वाटले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक धनाजी थोरवे राजेंद्र खोपडे नवनाथ जाधव कल्याणी भोसले दीपक पावरा यांनी परिश्रम घेतले. श्यामची आई पुस्तके वाचकांना आत्मपरीक्षण कौटुंबिक मूल्यांची कदर आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण देते असे मत शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील व कळंबी केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी पवार यांनी व्यक्त केले. पारायना च्या सांगता समारंभात कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी या पुस्तकातील साने गुरुजींनी सांगितलेले सर्व प्रसंग आपल्या जीवनात आत्मसात करावेत आणि आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन नवनाथ जाधव यांनी केले.




