आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-लेखणीची ३० वर्षांची तपश्चर्या गौरवली: महेंद्र (आबा) जाधव ‘शिवक्रांती शिवभूषण’ सन्मानाने सन्मानित.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) वाई:-लेखणीची ३० वर्षांची तपश्चर्या गौरवली: महेंद्र (आबा) जाधव ‘शिवक्रांती शिवभूषण’ सन्मानाने सन्मानित.

 वाई प्रतिनिधी सारिका गवते

किल्ले वैराटगड येथे दिमाखदार सोहळा; शिवछत्रपतींच्या तीन पिढ्यांशी निष्ठेचा सन्मान.

वाई दि. २२ : पत्रकारितेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे समाजाचा आरसा बनून कार्य करणारे आणि शिवछत्रपतींच्या वंशजांच्या तीन पिढ्यांशी एकनिष्ठ राहून ‘शिवसेवा’ व्रत जोपासणारे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र (आबा) जाधव यांना यंदाचा मानाचा ‘शिवक्रांती शिवभूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऐतिहासिक किल्ले वैराटगड येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महेंद्र जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर ह.भ.प. प्रविण महाराज शेलार, महंत शिवदत्त कवितागिरी पांचाळ (शिवदत्त मठ), सीमा भोसले (नगरसेविका), अमृता जाधव (सरपंच), रूपालीताई भिसे (राष्ट्रवादी महिला काँग्रेस नेत्या) आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी शिवक्रांती हिंदवी सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री स्वप्नील धनावडे व शिवश्री प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दुर्ग संवर्धन कार्याचे कौतुक केले. संस्थेच्या विधायक उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याची ग्वाही देण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना महेंद्र (आबा) जाधव भावूक होत म्हणाले, “वैराटगडच्या मातीत हा सन्मान स्वीकारताना ३० वर्षांच्या प्रवासाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. स्व. भाऊसाहेब महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शन हा माझ्या आयुष्याचा आधार आहे. हा पुरस्कार माझ्या लेखणीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीचा आहे.”
कार्यक्रमासाठी सागर धनावडे (भाजप युवा मोर्चा अध्यक्ष), जयदीप शिंदे, ॲड. अनिल सोनमळे, ‘बघा बघा’ फेम पत्रकार महेश पवार, सरपंच मंगेश गायकवाड, उपसरपंच दिनेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.
किल्ले वैराटगडच्या सानिध्यात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे वाई परिसरात आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

2) कराड:-शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘मदतीचे हात’चा मानवतेचा जागर; १०० हून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन्नदान-फळवाटप.

सांगली सिव्हिल व सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सेवायज्ञ; स्व.मीरा दोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्तुत्य उपक्रम.

कराड दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सांगली व मिरज येथे मानवतेचा हृदयस्पर्शी जागर अनुभवायला मिळाला. स्व. मीरा निरुपमा दिलीप दोशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट (मुंबई) आणि दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरग्रस्त व गरजू रुग्णांसाठी अन्नदान व फळवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
निरुपमा बेन यांच्याकडून प्राप्त निधीतून हा सेवायज्ञ पार पडला. सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हिल) येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत सकस आहार देण्यात आला. तसेच मिरज येथील श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जीवन ज्योत ट्रस्टचे संस्थापक हरखचंद सावला सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. मीनाताई मारू (समन्वयक, सांगली-कोल्हापूर विभाग), हिंदतरत्न डॉ. दिपक लोंढे (संस्थापक अध्यक्ष, दिपगंगा भागीरथी संस्था), शारदा लोंढे (‘अनाथांची माई’), संजय खाडे (समाजसेवा अधीक्षक, सांगली सिव्हिल) यांची उपस्थिती लाभली.
या सेवाभावी उपक्रमाचा लाभ १०० हून अधिक गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. रुग्णालय परिसरात कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असून, शिवजयंतीचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

3) लोणंद:-छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुजरातमध्ये मराठमोळा जल्लोष – पादरा येथे भगवेमय वातावरणात शिवकन्यांचे लेझीम सादरीकरण.

लोणंद दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुजरातमधील बडोदरा जिल्ह्यातील पादरा येथे मराठमोळ्या वातावरणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भगव्या झेंड्यांनी आणि शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आरती व शिवगर्जनेने करण्यात आली. अंबामाता मंदिर ते गायत्री मंदिरापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मराठमोळ्या शिवकन्यांनी लेझीम नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कल्पना पवार व जयश्री जाधव यांच्या ग्रुपने शिवगीत तसेच विठ्ठल गीतांवर सादर केलेले लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले. मराठी संस्कृतीचा ठसा गुजरातमध्ये उमटवत या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना कल्पना पवार म्हणाल्या, “मराठी संस्कृतीने नेहमीच सातासमुद्रापार आपला ठसा उमटवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “कार्याची ख्याती जगभर पसरली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे प्रत्येक मराठी माणसाचा कणा ताठ आहे.”
जयश्री जाधव यांनी महाराजांचे विचार आत्मसात करून पुढील पिढीला खरे शिवविचार देण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमात लाठ्यांचा खेळ, लेझीम तसेच विविध कलांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकण्यात आली. भगवेमय वातावरणात पार पडलेल्या या शिवजयंती उत्सवाने गुजरातमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचा डंका पुन्हा एकदा वाजवला.

4) लोणंद:-लोणंदमध्ये सागर शेळके दांपत्याचा वाढदिवस उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा दिमाखात.

लोणंद दि. २२ : लोणंद नगरपंचायतीचे लोकप्रिय नगरसेवक सागर शेळके आणि त्यांच्या पत्नी अर्चना शेळके यांचा वाढदिवस लोणंद शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष दिमाख प्राप्त झाला.
या सोहळ्यास नगराध्यक्षा मधुमती गालींदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, युवा नेते बंटी खरात, सचिन शेळके, राहुल घाडगे यांच्यासह नगरपंचायतीचे आजी-माजी नगरसेवक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सागर शेळके यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. अर्चना शेळके यांच्या महिला बचतगटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. महिलांना संघटित करून स्वावलंबनाकडे वाटचाल घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
“सागर मामांचे कार्य हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून सर्वसामान्यांच्या विकासासाठी सातत्याने झटणारे आहे,” असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या प्रसंगी लोणंद डिजिटल २४ चे संपादक पांडुरंग कुंभार, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत जाधव, आबा धायगुडे व अन्य पत्रकार उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. गजेंद्र मुसळे यांनी ओघवत्या शैलीत केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button