वाई:-“धोम परिसरात वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी भयभीत; पोलिसांकडून कडक कारवाईचे आश्वासन”
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“धोम परिसरात वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी भयभीत; पोलिसांकडून कडक कारवाईचे आश्वासन”

पत्रकार प्रतिनिधी अनिल वाडकर
वाई, ता. – वाई तालुक्यातील पश्चिम भागात तसेच धोम धरण परिसरात मागील काही दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी बांधवांच्या शेतातील विद्युत मोटारी, केबल तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या डीपी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
या सततच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शेती व ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन हंगामात पाणीपुरवठा खंडित झाल्याने पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकाराबाबत संतप्त शेतकरी व स्थानिक नागरिकांनी आज पोलीस प्रशासनाची भेट घेत निवेदन सादर केले. चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांवर कडक कारवाई करावी, रात्रीच्या गस्तीत वाढ करावी व चोरी गेलेल्या साहित्याचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावर पोलीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन दिवसांत चोरी गेलेल्या साहित्याचा तसेच संबंधित गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच परिसरात गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




