आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पार्ले (ता. कराड ):- दौलतराव अहिर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पार्ले गावात एन.एस.एस. विशेष निवासी कॅम्पला उत्साहात सुरुवात.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

  पार्ले (ता. कराड ):- दौलतराव अहिर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पार्ले गावात एन.एस.एस. विशेष निवासी कॅम्पला उत्साहात सुरुवात.

पार्ले (ता. कराड ):-
पार्ले येथे दौलतराव अहिर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विद्यार्थ्यांचा ७ दिवसीय विशेष निवासी कॅम्प उत्साहात सुरू आहे. या कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नांवर थेट काम करत समाजाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत.
या कॅम्पचे उद्घाटन मोहन पवार उपसरपंच पार्ले, रघुनाथ नलवडे,बाळासो नलवडे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश नलवडे, दिनकर नलवडे, भिकाजी पाटील, कॉलेजचे प्राचार्य मुल्ला सर,कच्छी सर यांच्या हस्ते पार पडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी एन.एस.एस. कार्यक्रमाची माहिती दिली,
कॅम्पच्या कालावधीत ग्रामस्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती व आरोग्य जनजागृती, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण तसेच सामाजिक सर्वेक्षण असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत.
“Not Me But You” या बोधवाक्यानुसार दौलतराव अहिर कॉलेजचे स्वयंसेवक विद्यार्थी पार्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देत असून या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त व सेवाभाव निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या विशेष निवासी कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे अध्यक्ष श्री. तुकाराम नलवडे व दादासाहेब पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास वेळेस पांडुरंग पाटील,तानाजी जाधव, शंकर कदम, दिनकर कदम, अशोक नलवडे, अधिकराव नलवडे,शशिकांत नलवडे,शुभम नलवडे, ग्रामस्थ व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button