ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुडाळ:-भाजपने उमेदवारी नाकारली तरी जावळीत जबाबदारी स्वीकारली…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भाजपने उमेदवारी नाकारली तरी जावळीत जबाबदारी स्वीकारली…

कुडाळ दि: राजकारणामध्ये निष्ठा व पक्षाच्या भूमिकेबाबत मांडणी केली जाते. परंतु, काही कारणास्तव उमेदवारी डावल्या नंतर त्याच पक्षाच्या विरोधात प्रचार करण्याची घटना घडते. याला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका अपवाद ठरला आहे. भाजपने उमेदवारी नाकारली तरी प्रचार कार्याची जबाबदारी घेणाऱ्या भाजप इच्छुक उमेदवार श्रीमती योगिनी बाळासाहेब फरांदे- पाटील यांच्यासह अनेक मान्यवर कमळ चिन्हाच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने भाजपची वैचारिक बांधिलकी दिसून आली आहे.
या बाबत माहिती अशी की, कुडाळ जिल्हा परिषद गट हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्यापासून अनेकांनी विविध राजकीय पक्षाकडे मुलाखती देऊन उमेदवारी मागितली. पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपकडे या जागेसाठी एक ए.बी. फॉर्म आणि उमेदवारी मागणारे पाच कर्तबगार महिला होत्या. असे असताना महिगाव येथील जयश्रीताई गिरी गोसावी यांनाच उमेदवारी मिळाली. त्यानंतर भाजप पक्षासोबतच कायम राहणार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या आदेशाने काम करणार अशी भूमिका घेऊन आनेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांची पत्नी श्रीमती योगिनी फरांदे- पाटील सध्या कमळ चिन्हाच्या प्रचारासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार जयश्री ताई गिरी गोसावी यांच्या समवेत खेड्यापाड्यांमध्ये भाजपचे विचार पोहोचवत आहेत. हा राजकारणातील गुण खऱ्या अर्थाने विजयश्री खेचून आणणार आहे.
श्रीमती योगिनी फरांदे पाटील यांच्यासमवेत आनेवाडी सरपंच वैशाली फरांदे, अलका फरांदे, हेमा फरांदे, जयश्री कदम, नलिनी चव्हाण यांच्या समवेत विविध महिला वर्ग प्रचारामध्ये आघाडी घेत आहे. मतदारांनाही जावळीच्या माजी सभापती जयश्रीताई गिरी गोसावी या परिचित असल्याने प्रचारामध्ये उदंड प्रतिसाद लाभत आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटातील सायगाव गणामध्ये सध्या केसकरवाडी, बिभवी,
धनगरपेढा, मेरुलिंग, मोरघर, आगलावेवाडी, कुडाळ,
सर्जापूर,सायगाव , रायगाव, महिगाव ,खर्शी तर्फ कुडाळ, प्रभूचीवाडी, दरेखुर्द व वाड्या वस्तीमध्ये प्रचारा निमित्त भेट देत आहेत.
राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा सर्वांचा अधिकार आहे. त्याचबरोबर त्या पक्षाच्या चिन्हाचा निष्ठावंतपणाने प्रचाराचाही अधिकार व त्याची जबाबदारी पार पाडणे कर्तव्य आहे. याच भावनेतून प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
आनेवाडी माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या विकास कार्यामुळे प्रचारानिमित्त अनेक गावांमध्ये योगिनी फरांदे पाटील यांना मान्यवरांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. भविष्यात संधी मिळेल अथवा न मिळेल परंतु, भाजप नेते आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवरांनी उमेदवारी मिळवण्यासाठी दिलेल्या साथ कधीही विसरणार नाही. भाजप पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे समाधान लाभले आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ जिल्हा परिषद गटाचे निवडणूक सुरळीत पार पडेपर्यंत प्रचार यंत्रणेमध्ये सामील होणार आहे . मतदार संघातील महिलावर्गांनी भाजपच्या कमळ चिन्हालाच मतदान करावे. असे त्यांनी आवाहन केले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button