कुडाळ:-राजकीय गटांनी ओ बी सी उमेदवार अर्ज भरला तरी कुडाळ जि.प.गटात सामसूम…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) कुडाळ:-राजकीय गटांनी ओ बी सी उमेदवार अर्ज भरला तरी कुडाळ जि.प.गटात सामसूम…
कुडाळ दि: जावळी तालुक्यामध्ये निवडणुका म्हटलं की, स्वयंभू नेते गण व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो. परंतु, कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजप विरोधात अपक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी निवडणूक होत आहे. इतर मागासवर्गीय महिला आरक्षण असल्यामुळे या निवडणुकीतील चुरस कमी झाली आहे.त्यामुळे सर्वत्र सामसूम वातावरण दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, दीपक साहेबराव पवार यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे आणि शिवसेनेचे ऋषिकांत शिंदे यांना मानणारा मोठा गट कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये आहे. या ठिकाणी मराठा , कुणबी मराठा,माळी समाजाचे मतदार खूप मोठी संख्येने आहेत. नशिबाने साथ दिली तर जिल्हा परिषद आरक्षणाचे अध्यक्षपद या भागाला मिळाले असते. परंतु, पहिल्या पायरीवरच आर्थिक निकषावर उमेदवारी डावल्याने इतर मागासवर्गीय समाजासोबतच जागृत व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरले आहे. याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उचलला आहे . या ठिकाणी माळी समाजाच्या सक्षम महिलेला संधी देऊन समतोल राखला आहे. एकेकाळी दीपक पवार यांच्यासाठी प्रचारामध्ये सहभागी होणारे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी आता पवार कुटुंबीय प्रचारासाठी खेड्यापाड्यात उतरणार असल्याने या कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये थोडीफार रंगत वाढणार आहे. पण सध्या तरी दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराकडून सामसुमी दिसत आहे. खाजगी हॉटेल मध्ये चर्चासत्र सुरू झाले आहे . यामध्ये स्थानिक पातळीवर कार्यरत असणारे तळागाळातील सामान्य कार्यकर्ते कुठे ही दिसत नाही. हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
कुडाळ सारख्या मोठ्या बाजारपेठ गावामध्ये जिल्हा परिषदेची हुकमी उमेदवारी न मिळाल्याने तोडजोडीचे राजकारण झाले का? असा प्रश्न कुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारणापेक्षाही प्रतिष्ठेला जागणारे मतदारांपर्यंत पेरला जात आहे. त्याचाही परिणाम या निवडणुक प्रचारात दिसून येणार आहे. तरी ही सर्वांनी मतदान करणे गरजेचे व लोकशाहीसाठी लाभदायक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माघारी घेण्याची तारीख जवळ आली तरी
धनदांडगे व जात दांडगे उमेदवारांचे प्रचार कुठेच दिसत नाही. मुठभर कार्यकर्त्यांची वाहनातील धावपळ सुरू आहे.प्रत्यक्षात मात्र मतदारांपर्यंत कोणी पोहोचले नाही. मेढा नजीक भोजनावळ झाली असली तरी मतदार उपाशी आहेत. असे नाही तर काहींनी संधी साधूंचे पाणी सुद्धा नको असा निर्धार केला आहे. त्याची मात्र जोरदार चर्चा कुडाळ गटात सुरू झालेली आहे.
सायगाव, बिभवी व आनेवाडी, कुडाळ, सर्जावर आणि सायगाव भागातील वाड्या वस्तीतील मतदान नेमके कुणाला जाईल? हे मात्र गुलदस्त्यात आहे. अजून प्रचाराची रंगत उडाली नसली तरी मतदारांना अपेक्षित उमेदवारी मिळाली नाही. हे मात्र सूर्यप्रकाश इतके स्वच्छ दिसत असल्याने नेत्यांची सुद्धा आता पळापळ थांबली आहे. तरीसुद्धा जागृत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करावा. वेळ पडल्यास उमेदवार पसंत नसेल तर नोटाला मतदान करावे असे नम्र विनंती कुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारणाचा गंध नसलेल्या पण सामाजिक भान असलेल्या युवा नेत्यांनी जाहीरपणे केली आहे. ती मात्र लक्षवेधी ठरली आहे.
2) कुसुंबी:-सागरा सारखे मन असलेल्या श्री धनावडे यांनी मन जिंकले…





