ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

करहर:-(जावळी)-म्हसवे गटात दत्ता गावडेंच्या अर्जाने भाजप नेत्यांना करावी लागणार शिष्टाई….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

म्हसवे गटात दत्ता गावडेंच्या अर्जाने भाजप नेत्यांना करावी लागणार शिष्टाई….

करहर दि: जावळी तालुक्यातील वाई व महाबळेश्वर तालुक्याची हद्द असलेल्या म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये इतर मागासवर्गीय पुरुष आरक्षण झाल्यापासून राजकारण तापले आहे. कुणबी मराठा दाखला असणाऱ्या इच्छुकांच्या मध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. खर्शी बारामुरे सुपुत्र व माजी उपसभापती दत्ता गावडेंनी मेढा येथे सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जामुळे आता भाजप नेत्यांना शिष्टाई करावी लागणार आहे. असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर अनेक मातब्बर मंडळींनी जावळी तालुक्यात कुणबी मराठा दाखला काढून आपणही इतर मागासवर्गीय आहोत हे कागदोपत्री दाखवून दिले आहे. त्यामुळे आता इतर मागासवर्गीय आरक्षित जागेवर दावा सांगितल्याने राजकारणामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे.
जावळी तालुक्याचे किंग मेकर समजणारे सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी इतर मागासवर्गीय गटातील कुणबी मराठा दाखला असल्याने म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीन त्यांना अधिकार प्राप्त केलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समिती दोन गटांमध्ये योग्य उमेदवार देऊन भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार केला आहे.
निवडणुकीचे तंत्र आणि व्यक्तिगत मंत्र यामध्ये श्री.मानकुमरे माहीर आहेत. त्यांच्यापुढे योग्य उमेदवार न दिल्यास टिकाऊ लागणार नाही. याचे अनेकदा प्रात्यक्षिक पाहिले आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर अनेक अर्ज येतील आणि माघारी घेतले जातील. अशी शंका उपस्थित केली असतानाच जावळीचे माजी उपसभापती श्री दत्ता गावडे यांनी सुद्धा कुणबी मराठा दाखल्यावर म्हसवे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. गेले सहा महिन्यापासून त्यासाठी त्यांनी मोर्चा बांधणी केलेली आहे. खर्शी बारामुरे या ठिकाणी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेची इमारत पूर्ण करून त्या ठिकाणी आधुनिक शिक्षणासाठी संगणक भेट दिलेल्या आहेत.
महू – हातगेघर धरण
परिसरातील अनेक विकास कामांमध्ये भाजप नेते श्री . मानकुमरे व श्री गावडे यांचा सिंहाचा वाटा आहे. दांडगा लोकसंपर्क असल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपला निश्चितच फायदेशीर ठरेल. परंतु या ठिकाणी श्री. मानकुमरे यांचा करिष्मा असला तरी सुप्त प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर सुद्धा दबक्या आवाजात ऐकू येत आहे. याचाही विचार करावाच लागणार आहे. दोन्हीही नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत.
आज जावळी तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपच्या वतीने व अपक्ष असे दोन अर्ज श्री दत्ता गावडे यांनी दाखल केले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत अशोक गोळे, जयवंता कदम, महादेव भाले घरे, शंकर गोळे व म्हसवे जिल्हा परिषद गटातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी जयश्री मोरे व तहसीलदार प्रवीण मुदगल आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता श्री गावडे यांच्या समवेत इतर जागेसाठी जावळीतून अनेकांनी अर्ज दाखल केल्यामुळे भाजप नेतृत्वाला आता ए बी फॉर्म देताना विचार विनिमय करून निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय पर्याय राहिला नसल्याची चर्चा रंगली आहे…

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button