सातारा:-कुमारी प्रांजल शिंदेंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कुमारी प्रांजल शिंदेंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड.

सातारा दि: चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने आता मुली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध करत आहेत. सातारा जिल्ह्यातील खेड, न्यू विकास नगर येथील कुमारी प्रांजल जगदीश शिंदे या बालिकेची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड झाली आहे. या निवडीबद्दल संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील क्रीडा क्षेत्राशी निगडित अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सातारा शहरात नजीकच्या न्यू विकास नगर, खेड येथील कुमारी प्रांजल जगदीश शिंदे या बालिकेला लहानपणापासून कराटे या खेळाची आवड होती. तिचे पालक व सामाजिक कार्यकर्ते जगदीश शिंदे यांच्या प्रोत्साहानाने तिने शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर राज्यस्तरीय वसई या ठिकाणी झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त केले.
सदर बालिका प्रांजल शिंदेचे उपस्थित सर्वांनीच मनापासून कौतुक करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये या प्रांजलला संधी मिळाल्यास भारताला कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देईल. असे अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष श्री रमेश उबाळे यांनी या बालिकेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आपल्या भारतामध्ये कुस्तीमध्ये पहिले कास्य पदक मिळवून देणारे महान कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या सातारा जिल्ह्यात आता कराटे स्पर्धेमध्ये कुमारी प्रांजल शिंदे हिने आपल्या कराटे खेळाचा ठसा उमटवला आहे.
भविष्यात या बालिकेला कराटे प्रकारच्या क्रीडा क्षेत्राला संधी मिळाल्यास ऑलिंपिक स्पर्धेतही निश्चितच यश मिळेल. असं भाकीत करण्यात येत आहे.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी कुमारी प्रांजल शिंदे ही पहाटेपासून परिश्रम घेत आहे. तिला मान्यवरांचे मार्गदर्शन लाभत आहे.




