पुसेसावळी पंचायत समिती गणात रयत क्रांतीकडून सौरभ चव्हाण यांची ताकदवान उमेदवारी.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुसेसावळी पंचायत समिती गणात रयत क्रांतीकडून सौरभ चव्हाण यांची ताकदवान उमेदवारी.

खटाव तालुक्यातील पुसेसावळी पंचायत समिती गणासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून सौरभ प्रल्हाद चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सौरभ चव्हाण हे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे खटाव तालुका युवक आघाडी अध्यक्ष असून शेतकरी, युवक व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली आहे.
ही निवडणूक रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख मा.आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.सचिन नलावडे आबा यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवली जात आहे.
सौरभ चव्हाण यांच्या उमेदवारीला पुसेसावळी गणातील सर्व शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा दिल्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या मते ही निवडणूक केवळ पदासाठी नसून, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. शेतकरी एकजुटीच्या जोरावर बदल घडवण्यासाठी ही निवडणूक संघटितपणे व ठाम भूमिकेत लढवली जात आहे. पाणीटंचाई, शेतीमालाला योग्य दर, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, युवकांना रोजगार आणि पारदर्शक कारभार या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेत शेतकरी व सर्वसामान्यांचा आवाज पंचायत समितीत बुलंद करण्याचा निर्धार सौरभ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
या उमेदवारीला रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आघाड्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असून संघटनेच्या वतीने ही निवडणूक ताकदीने लढवली जाणार आहे.पुसेसावळी पंचायत समिती गणात शेतकरी एकजुटीच्या माध्यमातून बदलाची नवी राजकीय चळवळ उभी राहत असल्याची चर्चा सध्या संपूर्ण खटाव तालुक्यात सुरू आहे.




