श्रीरामपूर/माळेवाडी:-मिशन निरंतर मिलाप अंतर्गत जवानांच्या कुटुंबियांशी थेट संवाद ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मिशन निरंतर मिलाप अंतर्गत जवानांच्या कुटुंबियांशी थेट संवाद ….

श्रीरामपुर / माळेवाडी (प्रतिनिधी ) मेकॅनाइज्ड इनफट्री सेंटर अँड स्कुल अहिल्यानगर मधील माजी सैनिक ‘ वीरणारी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासच्या उद्देशाने ” मिशन निरंतर मिलाप 1 .0 ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत ” निरंतर मिलाप टीम . ला आज ब्रिगेडियर पी . सुनील कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा . दाखवून रवाना करण्यात आले . हा उपक्रम लेक्टनंट जनरल पी .एस शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पित करण्यात आला असून . माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी त्यांच्या दारातच सोडविणे , हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नर अशोक कुमार ( चीफ रेकॉर्ड ऑफिसर व कमांडिंग ऑफिर ‘ रेकॉर्ड्स ‘ मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेडिमेंट ) तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
या टय्यातील ” निरंतर मिलाप टीम ‘ मध्ये एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर ‘ दोन नॉन कमिशन्ड ऑफिसर्स तसेच मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे . ही टीम केरळ ‘ तमिळनाडू ‘ आंध्र प्रदेश ‘ तेलंगणा आणि कर्नाटक या दक्षिण भारतातील पाच राज्यांतील १४ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन माजी सैनिक ‘ वीरणारी व शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी सेवाद साधणार आहे त्यांच्या तक्रारी ‘ निवृत्तीवेतन ‘ वैद्यकीय सुविधा ‘ कल्याणाकरी योजना आदी विषयांवर जागेवरच मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण करण्यास येणार आहे
या उपक्रमामुळे रेजिमेंट व तिच्या माजी जवानांच्या कुटुंबीयांमधील भावनिक नाते अधिक दृढ होणार असून त्यांच्या समस्या समजून घेत सन्मान ‘ संवेदना व तत्परतेने मदत करण्याची भावना अधिक बळकट होणार आहे मिशन निरंतर मिलाप ‘ हा उपक्रम केवळ प्रशासकीयच नव्हे तर मानवी दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून ‘ देशासाठी सेवा बजावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी रेडिमेंट खेबीरपणे उभी आहे हा संदेश यातून दिला जात आहे.




