कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज मध्ये सुमारे तीस लाखाची बनावट खते व कीडनाशके कृषी विभाग व पोलिसांकडून जप्त.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वडूज मध्ये सुमारे तीस लाखाची बनावट खते व कीडनाशके कृषी विभाग व पोलिसांकडून जप्त.

वडूज दि: हुतात्म्यांची नगरी असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट खते व कीटकनाशक जप्त करण्यात कृषी विभाग व पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३० लाख रुपयाचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट साठा सापडल्याची प्रथमच घटना खटव तालुक्यात घडली आहे. अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे.
याबाबत माहिती अशी की , वडूज नगरीमध्ये बनावट खत व कीटकनाशक तयार करून ते शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी सातारा जिल्हास्तरीय भरारी पथक कृषी विकास अधिकारी श्री गजानन ननवरे जिल्हा गुणवंत नियंत्रक निरीक्षक संजय फडतरे, कृषी अधिकारी के.के. राऊत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे रोहित फराने
यांनी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज येथील बनावट खत व कीटकनाशकावर धाड टाकली.

वडूज ता. खटाव येथील प्रतीक काळे यांचे राहते घरासमोरून पोलिसांनी गोदामा मध्ये बनावट रासायनिक खते कीटकनाशक यांचा साठा सापडला. अनुदानित रासायनिक खतांचे पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचे डीएपी (१८ :४६ ) या खताच्या ९० भरलेल्या गोण्या तसेच नाव नसलेल्या सुमारे ३९० कच्चामाल डीएपी खत म्हणून वापरणेच्या उद्देशाने तेथे आढळून आले तसेच रासायनिक खत म्युरेट ऑफ पोटॅश याच्या सुद्धा १५ गोण्या आढळून आल्या .
रासायनिक खत बोरिक ऍसिड नॅशनल ऍग्रो हायटेक या कंपनीच्या नावे सुमारे १ मेट्रिक टन . कीटकनाशक क्लोरोपायरीफॉस १० टक्के दाणेदार कीटकनाशक सुमारे २.७ मॅट्रिक टन तणनाशक ग्लाय फॉसेट ४१ टक्के एस एल या तणनाशकाचे सुमारे एक लिटर पॅकिंग मधील ३४० बाटल्या संशयित तननाशक ग्लायफॉसेट २०० लिटर बॅरल मध्ये आढळून आले. याचा वापर एक लिटर पॅकिंग मध्ये करण्यासाठी येणार होता . उंदीर नाशक झिंक फॉस्फेट सुमारे १२ किलो १० ग्रॅम पॅकेटमध्ये तसेच संशयित कीटकनाशक अल्युमिनियम फॉस्फाईड १० ग्रॅम पॅकेटमध्ये सुमारे २० किलो आढळून आले. त्याचबरोबर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड तथा जय किसान कंपनीच्या १८ : ४६ व १० :२६.२६ या खताच्या नवीन छपाई केलेल्या सुमारे१५८० रिकाम्या गोण्या इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या सुमारे २५० रिकाम्या गोण्या आणि इफको को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या १८ ४६ या खताच्या सुमारे २०० नवीन छपाई केलेल्या रिकाम्या गोण्या आढळून आल्या असा एकूण एकंदर सुमारे २५.५० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासणी करते वेळी कच्च्या मालाच्या सुमारे १९८० वापरलेल्या गोण्या दिसुन आल्या. त्या अर्थि अंदाज ३० लाखांचे बनावट खत विकले असल्याचा संशय आहे.
मोजे टाकळवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी टाकळवाडी ता. फलटण जिल्हा सातारा येथील बोगस रासायनिक खतावरील दाखल झाल्याच्या तक्रारी अनुषंगाने व मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण करीत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button