जावळी:-कुडाळ नगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तुने शेतकऱ्यांचा सन्मान..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कुडाळ नगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तुने शेतकऱ्यांचा सन्मान..

कुडाळ दि: जावळी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या तसेच सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कुडाळ नगरीमध्ये सध्या बहुउद्देशीय व्यापारी संकुल उभे राहत आहे. यामुळे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे. अशी माहिती शेतकरी व जावळी तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश भाऊ भोसले यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र राजपुरे, सौरभ बाबा शिंदे व मान्यवरांच्या सहकार्याने कुडाळ शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार व शेती व्यवसायाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ या भावनेतून नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बहुउद्देशीय व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे . नुकतेच या नूतन वास्तूचे भूमिपूजन माजी आमदार सदाशिव सपकाळ व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यामुळे कुडाळ नगरीच्या विकास कामाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. पहिला मजला व तळमजला या ठिकाणी २८गाळे बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या निवासस्थानाची सोय होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन असे त्याचे नामकरण करण्यात येणार आहे. जावळी तालुक्यातील महत्वकांक्षी अशा महू – हातगेघर धरणाचे पाणी आता कुडाळ , सायगाव शिवारात लवकरच येणार आहे. त्यामुळे शेती उत्पन्नात ३० ते ४० टक्के वाढ होणार आहे. यातून शेतकरी कुटुंबाला उदरनिर्वाहासोबतच आर्थिक पाठ्यबळ मिळणार आहे. जावळीचे माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे यांच्या समवेत अनेक लोकप्रतिनिधींनी कुडाळ नगरीमध्ये शेती उत्पन्न बाजार समितीच्या वैभवाचे रोपटे लावले होते. आज त्याची वाटचाल जोमाने सुरू झालेले आहे. भविष्यात या ठिकाणी भाजीपाला मार्केट त्याचबरोबर शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी आणखीन भव्य इमारत उभारण्यात येणार आहे.
सध्या जावली शेती उत्पन्न बाजार समितीच्या ड वर्गातून क वर्गात प्रवेश केला असून शेतकऱ्यांची समर्थ साथ लाभल्यानंतर अ वर्गापर्यंत निश्चितच मजल मारली जाईल असा विश्वास शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. चार वर्षांपूर्वी तीन लाख ७८ हजार ७०७ इतके उत्पन्न बाजार समितीला झाले होते. ते आता तीन वर्षात २५ लाख ३३ हजार ७२७ एवढे झालेली आहे. शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लालसिंगराव बापूसाहेब शिंदे व्यापारी संकुल, आमदार शशिकांत शिंदे बहुउद्देशीय व्यापारी संकुल, भुसार मार्केट इमारत कार्यालय व सेल हॉल अशा पद्धतीने प्रत्येक पायरीवर यश मिळाले आहे. त्याचबरोबर शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीसाठी सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंतराव शिंदे, सौ .योगिता शिंदे, सौ कमल दळवी यांच्या सर्व संचालक मंडळाचे तसेच शेतकऱ्यांचे व माजी सभापती राजेंद्र भिलारे, दत्ता भालेघरे , भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे,जिल्हा बँकेचे सर्व व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे आधी मान्यवरांचेही सहकार्य लाभत आहे.
या शेती उत्पन्न बाजार समितीच्या बहुउद्देशीय व्यापारी संपलीचे पूर्ण इमारतीची बांधणी ही एका वर्षात पूर्ण होईल. यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध झाले असून या देखण्या इमारतीमुळे शेतकऱ्यांना समाधान वाटेल. असे कामकाज होणार असल्याची माहिती जावळी शेती उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक महेश देशमुख यांनी काही प्रसार माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाबाबत समाधानकारक उत्तर दिले.




