आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-“दुर्गम डोंगरातून सत्याचा आवाज — निर्भीड पत्रकारितेचा जिवंत दस्तऐवज!” – संपादक प्रल्हाद चव्हाण

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सातारा:-“दुर्गम डोंगरातून सत्याचा आवाज — निर्भीड पत्रकारितेचा जिवंत दस्तऐवज!”- संपादक प्रल्हाद चव्हाण

अतिदुर्गम भागातही सत्याची मशाल पेटती ठेवणारा पत्रकार आणि त्यामागे उभा असलेला खंबीर संपादक — प्रल्हाद सरांप्रती कृतज्ञतेचा स्वर.

क्रांतिकारी जय भीम!
जय शिवराय!
जय संविधान!
आजच्या काळात जिथे पत्रकारितेवर दबाव, दुर्लक्ष आणि असुरक्षितता वाढत आहे, तिथे संविधानवादी व निर्भीड पत्रकारितेचा दीप अखंड प्रज्वलित ठेवणारे नेतृत्व म्हणजे आरपीएस स्टार न्यूजचे आदरणीय संपादक प्रल्हाद सर सातारचे होत.
महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ, मोबाईल नेटवर्क व इंटरनेटपासून वंचित अशा भागात गेली दोन ते तीन वर्षे आरपीएस स्टार न्यूजचे पत्रकार म्हणून कार्यरत असलेले उत्तम भालेराव हे सामान्य, वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून प्रामाणिकपणे काम करत आहेत.
नेटवर्क नसलेल्या भागातून बातमी पाठवण्यासाठी अनेकदा एक ते दोन किलोमीटर पायपीट करून रेंज शोधावी लागते, मात्र अशा कठीण परिस्थितीतही पत्रकारितेची मशाल त्यांनी कधीही विझू दिलेली नाही.
या संघर्षमय प्रवासात संपादक प्रल्हाद सर हे फक्त संपादक न राहता एक खंबीर आधारस्तंभ ठरले आहेत. रात्री-अपरात्री, ज्या क्षणी नेटवर्क मिळेल त्या क्षणी फोन उचलून प्रतिसाद देणे, बातमीचे गांभीर्य समजून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि सत्याच्या बाजूने ठाम उभे राहणे — ही त्यांची कार्यशैली आजच्या पत्रकारितेसाठी आदर्श ठरत आहे.
आज अनेक ठिकाणी पत्रकारांना दुर्लक्षित केले जाते, मात्र प्रल्हाद सरांनी वेळोवेळी योग्य न्याय, योग्य सन्मान आणि योग्य पाठबळ देत पत्रकारांवरील विश्वास दृढ केला आहे. त्यांची भूमिका ही संविधानवादी, बहुजनवादी आणि निर्भीड पत्रकारितेचे जिवंत उदाहरण आहे.
अशा प्रेरणादायी, संवेदनशील आणि लढवय्या संपादकाच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अभिमान प्रत्येक प्रामाणिक पत्रकाराला वाटतो.
आरपीएस स्टार न्यूजचा झेंडा त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी उंच फडफडत राहो, हीच क्रांतिकारी शुभेच्छा!
✍️पत्रकार प्रतिनिधी / नाव:-उत्तम भालेराव
तालुकाध्यक्ष – आरपीएस स्टार न्यूज, महाबळेश्वर
जबाबदार व जागृत नागरिक
संविधान अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते
तालुका – महाबळेश्वर

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button