सातारा:-पत्रकार दिनानिमित्त आज आरोग्य शिबीर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार दिनानिमित्त आज आरोग्य शिबीर.

सातारा:
पत्रकार दिनानिमित्त सातार्यात आज आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उत्कृष्ठरीत्या पार पाडल्याबद्दल पत्रकार विनोद कुलकर्णी यांचा सत्कार नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या केला जाणार आहे. सातारा जिल्हा पत्रकार भवन, गोडोली येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, डिजिटल मिडीया परिषद व आधार हॉस्पिटल यांच्यावतीने पत्रकार दिन व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आराेग्य शिबीरामध्ये ह्दयाची काळजी कशी घ्यावी व सीपीआर कसा दिला जावा? याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. यासाठी डॉ.जयेंद्र जाधव, डॉ.मिलिंद सुर्वे, डॉ.कबीर मुलाणी हे मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. या आरोग्य शिबीरासाठी सातार्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




