ब्रेकिंग न्यूज :- फलटण ग्रामीण पोलीसांचा अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कारवाईचा धडाका कायम.. 150 लिटर हातभट्टी दारु जप्त.
प्रतिनिधी :- शुभंम भापकर फलटण

ब्रेकिंग न्युज
rps press फलटण तालुका
*फलटण ग्रामीण पोलीसांचा अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कारवाईचा धडाका कायम*..
*150 लिटर हातभट्टी दारु जप्त* …
*सदरची कारवाई आपल्या ग्रुपच्या सदस्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली*
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामगाव तालुका फलटण गावचे हददीत साखरवाडी ते मुरुम जाणारे रोडलगत काढीव हातभट्टी दारु अड्डय़ावर पोलीसांनी छापा टाकून १५० लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल निखील आत्माराम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे खामगाव ता. फलटण गावचे हददीत साखरवाडी ते मुरुम जाणारे एका घराचे रोडलगत देशी गावठी काढीव हातभट्टी दारुची बेकायदेशीर पणे विक्री चालु आहे. पोलीस उपनिरीक्षक धोंगडे व साखरवाडी पोलीस चौकीतील पोलीस हवालदार मोहन हांगे, पोलीस कॉन्स्टेबल खरात यांनी समक्ष जावुन पहिले असता रस्त्याचे बाजुस एका घराचे आडोशाला एक व्यक्ती पिवळा कन घेवून बसलेला दिसला त्यास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप केज राठोड ( वय २५ वर्षे सध्या रा. खामगाव ता. फलटण मुळ रा. जुनी जेजुरी दत्तमंदिराचे पाठीमागे ता. पुरंदर जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचे कब्जातून १५० लिटर काढीव हातभट्टी त्याची किंमत ३० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची हातभट्टीची दारु जागेवरच नष्ट करण्यात आली आहे.