कराड:-शिक्षण मंडळ,कराडमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिक्षण मंडळ,कराडमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.

कराड: – शिक्षण मंडळ,कराडमध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे हे यंदाचे चौथे वर्ष होते. विविध शाळांतील शंभर गटांची नोंदणी यावर्षी आकर्षणाचा विषय ठरला.
सातारा व सांगली जिल्ह्यातील तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे बहुपर्यायी प्रश्नसंच असलेल्या लेखी परीक्षेतून प्रत्येक गटातून पहिल्या सहा आलेल्या संघांना प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले.प्रत्येक गटामध्ये निवडलेल्या सहा संघांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मॉर्डन कॉलेज ऑफ एज्युकेशन, मलकापूरचे प्राचार्य नंदकुमार धनवडे यांच्या हस्ते संपन्न झाला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,”विद्यार्थ्यांनी गणित समजून घ्यावे,गणित जगायला शिकावे, गणितातून तर्कशक्ती व संयम विकसित होतो, विद्यार्थ्यांना कार्यप्रवण ठेवण्याचे काम गणितच करते, आधुनिक गणकीय युगाचा पाया गणितानेच घातलेला आहे ,गणित मानवी जीवनाला व्यापणारा विषय आहे तसेच गणित विषयाच्या अभ्यासातून मानवी मूल्ये सुद्धा शिकता येतात.
पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक शिक्षण मंडळ, कराडच्या व्हाईस चेअरमन अनघा परांडकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय सचिन कुलकर्णी यांनी करून दिला तर स्वागतपर सत्कार अनघा परांडकर यांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषिक यादीचे वाचन मेघना भोसले व बाळासाहेब देसाई यांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी सहाय्यभूत सर्व घटकांचे आभार ज्योती ननावरे यांनी मानले तर सूत्रसंचालन जीवन थोरात यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभास गुणवत्ता विकास समितीच्या सदस्या वृषाली पाठक, सुवर्ण देशपांडे,शिक्षण मंडळ, कराडच्या सर्व शाखांचे प्रमुख, विविध शाळातून आलेले शिक्षक,पालक व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेचे नीटनेटके आयोजन, पारदर्शी दृष्टिकोन, विषयाची सखोलता, योग्य आयोजन याबाबत विविध शाळेतून आलेले शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.आणि शिक्षण मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक ही केले संस्थेच्या सर्व गणित शिक्षकांनी व्हाईस चेअरमन अनघा परांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेघना भोसले आणि बाळासाहेब देसाई यांच्या केलेल्या मेहनीतची चे हे फलित ठरले.
गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
पहिला गट- इयत्ता तिसरी व चौथी
प्रथम क्रमांक -रोटरी प्राथमिक शाळा,मलकापूर,कराड
द्वितीय क्रमांक- नूतन मराठी शाळा,कराड
तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधवमळा,ओंड
चतुर्थ क्रमांक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले,उंब्रज
दुसरा गट- इयत्ता पाचवी व सहावी
प्रथम क्रमांक -पी.एम.श्री नगरपालिका शाळा क्रमांक 3
द्वितीय क्रमांक -न्यू इंग्लिश स्कूल सातारा.
तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद शाळा वडगाव हवेली ,कराड
चतुर्थ क्रमांक-सरस्वती विद्यामंदिर,कराड
तिसरा गट इयत्ता सातवी व आठवी
प्रथम क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल सातारा
द्वितीय क्रमांक- टिळक हायस्कूल,कराड
तृतीय क्रमांक- होली फॅमिली स्कूल विद्यानगर,कराड
चतुर्थ क्रमांक -यशवंत हायस्कूल,कराड
गट चौथा इयत्ता नववी दहावी
प्रथम क्रमांक -न्यू इंग्लिश स्कूल सातारा
द्वितीय क्रमांक -टिळक हायस्कूल,कराड
तृतीय क्रमांक -एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल कराड
चतुर्थ क्रमांक -लाहोटी कन्या प्रशाला,कराड




