विदर्भ:-विदर्भात राजकीय भूकंप! ठाकरे बंधूंची युती जाहीर; 4 महापालिका, 8 जिल्ह्यांत शिवसेना–मनसे एकत्र.
पत्रकार प्रमोद काळे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

विदर्भात राजकीय भूकंप! ठाकरे बंधूंची युती जाहीर; 4 महापालिका, 8 जिल्ह्यांत शिवसेना–मनसे एकत्र.

विदर्भाच्या राजकारणात मोठा उलथापालथ करणारा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती अधिकृतपणे जाहीर झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील चार प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
फक्त महापालिकाच नव्हे तर विदर्भातील एकूण आठ जिल्ह्यांमध्ये ही युती प्रभावीपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने विदर्भातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून अजित पवारांसोबत युतीबाबत ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. जर अजित पवारांसोबत युती झाली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आले आहेत.
या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील समीकरणे देखील पुन्हा एकदा चर्चेत आली असून, विदर्भातील निवडणुका आता फक्त सत्ता नव्हे तर राजकीय अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे विदर्भात उत्सुकता, चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांमध्ये थेट सामना आणि मोठे धक्के पाहायला मिळणार हे निश्चित मानले जात आहे.




