वाई सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे; सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचा जोरदार वार.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे; सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचा जोरदार वार.
वाई (जि. सातारा) :
वाई शहर व परिसरात सातत्याने शारीरिक व मालमत्तेविरोधातील गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीवर अखेर प्रशासनाने कडक आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत टोळीचा प्रमुख यश उर्फ वश्या अभिजीत सोंडकर (वय १९, रा. गंगापुरी, वाई) तसेच टोळी सदस्य मेघराज उर्फ सोन्या संतोष मोरे (वय २०, रा. गंगापुरी, वाई) यांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
सदर आरोपींविरोधात वाई शहर व तालुका परिसरात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नागरिकांच्या तक्रारी, पोलिसांकडे उपलब्ध असलेली गोपनीय माहिती आणि आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाई शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
या तडीपारीच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, वाई शहर अधिक सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
मी आहे सारिका गवते, RPS Star News. धन्यवाद.




