ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव :-थोरवेवाडी(पुसेसावळी) हद्दीतील शेतकऱ्यांना MSEB च्या भोंगळ कारभारामुळे आपला जीव धोक्यात घालून करावा लागतोय पाण्यासाठीअट्टाहास.
प्रतिनिधी :- सौरभ चव्हाण खटाव :-95039 95968

थोरवेवाडी(पुसेसावळी) हद्दीतील शेतकऱ्यांना MSEB च्या भोंगळ कारभारामुळे आपला जीव धोक्यात घालून करावा लागतोय पाण्यासाठी अट्टाहास. मौजे थोरवेवाडी येथील ऑटर सप्लाय च्या डीपी मधील काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे तेथील स्थानिक वायरमन देशमुख यांना संपर्क केल्यास टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत त्यामुळे वायरमन च्या अनुउपस्थितीत शेतकरी पाण्यासाठी हवालदिल होऊन स्वता डीपीतील काम करत आहे जर एखाद्या शेतकऱ्याची जीवित हानी झाली तर MSEB जबाबदार राहणार का? याची स्थानिक नागरीक चर्चा करत आहेत त्यामुळे MSEB च्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.