पुणे:-येरवडा खुले कारागृहात वाढदिवसानिमित वृक्षरोपण व प्लेट – बाऊल वाटप.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

येरवडा खुले कारागृहात वाढदिवसानिमित वृक्षरोपण व प्लेट – बाऊल वाटप.

पुणे दि: येरवडा खुले कारागृहात “संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच,आर. के. फाउंडेशन, जेजुरी संस्थान, ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा संस्था” यांचे संयुक्त विद्यमाने खुले कारागृहातील बंदयांसाठी १०० नग फायबर ताट व २०० वाटीचे वाटप कार्यक्रम तसेच कारागृहाचे परिसरात ४० नग झाडांचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
सदर कार्यक्रमासाठी संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, जेजुरी संस्थानचे मंगेश जेजुरीकर, आर. के. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री साळुंखे, ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा संस्थाचे श्री चारूहास रेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री शामकांत शेडगे, अधीक्षक यांनी केले. सदर कार्यक्रमांतर्गत मान्यवरांचे हस्ते बंदयांना फायबर ताट, वाटीचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांचे हस्ते साधारण ४० रोपे (वड, पिंपळ, पिंपरण, जांभूळ, लक्ष्मीतरु, शिरीष, काटेसावर, आंबा, भेंडी, ताम्हण, बकुळ, बहावा, बोर, आपटा, लाजाळू, अर्जुन, जंगली बदाम, फणस, हिरडा, बेल, उंबर इ ) प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह माननीय डॉ. सुहास वारके व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह श्री योगेश देसाई व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे श्री सुनील ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमासाठी श्री. शामकांत शेडगे, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, पुणे, श्री. नागेश एम कांबळे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री हेमंत पाटील, तुरुंगाधिकारी, श्री नागनाथ भानवसे तुरुंगाधिकारी, श्रीमती. निशा श्रेयकर, तुरुंगाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती निता उके, वरिष्ठ लिपीक स्नेहा दलाल, लिपीक प्रवीण खुसपे, सुभेदार सुनील गायकवाड, बालाजी सावंत, दत्तात्रय चव्हाण, हवालदार दत्तात्रय मोडक, शिपाई महेंद्र लोहकरे, महेश हळदकर, अविनाश पवार, संतोष जाधव, वसीम जमादार, संतोष शिनगिरे, महिला सरला साबळे, शैला कदम व इतर कर्मचारी व बंदी हजर होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या सोहळ्याचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले.




